तुमच्यात जर का एक मत होणार नसेल तर, सर्वानी राजीनामे द्या : अजित पवार संतापले

0
98
ajit pawar

तुमच्यात जर का एक मत होणार नसेल तर, सर्वानी राजीनामे द्या : अजित पवार संतापले 

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांचा रोकठोक स्वभाव आणि आक्रमक शैली सर्वांनाचं माहिती आहे. याचा अनुभव पुन्हा बारामती नगरपालिकेच्या नगरसेवक मिटिंगमध्ये पाहायला मिळाला. मानापमान नात्यावरून राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये सुरू असणारा वाद मिटविण्यात अजित पवारांनी सर्वानाच खडे बोल सुनावले. 

बारामतीच्या शासकीय विश्रामगृहात नगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी नगरसेवक एकमेकांबद्दल तक्रारीचा पाढा वाचत होते. काही क्षणी नगरसेवकांच्या या शाब्दिक युद्धात अजितदादांनी हस्तक्षेप केला . मात्र हि भांडण समाप्त होत नसल्याचे पाहत अजित पवार संतप्त झाले. शेवटी अजित पवारांनी सर्वाना कानपिचक्या देत सगळ्यांनी राजीनामे द्या थेट प्रशासक बसवून त्यांच्याकडून सगळी कामे करून घेतो अशा शब्दात सुनावले . त्याचबरोबर सत्ता आल्यानंतर शहराचा विकास करायचा कि तुमच्यातील वाद  मिटवायचे असा प्रतिसवालहि नगरसेवकांना केला. 

नगरसेवकांतील कलगीतुरा थांबविण्यासाठी अजित पवारांनी सर्वाना एकदिलाने काम करा नाहीतर राजीनामे देऊन घरी हा, मी प्रशासक आणून विकास कामे करून घेतो, अशी तंबी दिल्यावर नगरसेवक शांत झाले. अलीकडेच अजित पवारांनी केलेलं बंड राज्यभर गाजलं होत. २२ नोव्हेंबरच्या रातोरात अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात देवेंद्र फडणवीस याच्या सरकरमध्ये सहभागी झाले. देवेंद्र फडवीसानी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पवार कुटुंबात मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झालं होत. 

अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. अजित पवारांच्या बंडामुळे आमदार फुटण्याची भीती पक्षाला होती. अनेक आमदार बेपत्ता होते. परंतु काही दिवसात आमदार माघारी परतले. तसेच अजित पवारांचे बंड शमवण्यात शरद पवार आणि कुटूंबाला यश आलं. आणि शेवटी अजित पवारांनी फडणवीस सरकार मधून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रिय झाले.