बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्वपूर्ण बैठक : राज ठाकरेंच्या भूमिकेसाठी लक्ष

0
71
raj thackeray

बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्वपूर्ण बैठक : राज ठाकरेंच्या भूमिकेसाठी लक्ष

मुंबई.: राज्यात गेल्या महिनाभपासून सत्तासंघर्षाचे नाट्य रंगले आहे. शिवसेने-भाजप यांच्यातील युती तुटून राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग करण्यात आला आहे. मागील काही दिवस सुरु असलेल्या या नात्यावर सत्तांतराने अंतिम पडदा पडल्यानंतर मनसे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. 

मनसे च्या या बैठकीला पक्षाचे सर्व सरचिटणीस , उपाध्यक्ष उपस्थित राहणार असून सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील वाट चालीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. राज्यात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी घरोबा करत सत्ता स्थापन केली आहे. तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे. 

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केला होत. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत स्वबळावर लढणाऱ्या मनसेला राज्यात केवळ १ जागा जिंकता आली. मनसेनं  उभा निवणुकीत १०० च्या आसपास उमेदवार उभे केले होते. त्यातील कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनसेचे राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले. मनसेचा एकमेव आमदार राज्यात निवडून आला असला तरी मुंबई ठाणे पट्यात काही जागांवर मनसेचे राजू पाटील आमदार म्हणून निवडू आले. 

मनसेचा एकमेव आमदार राज्यात निवडून आला असाल तरी मुंबई , ठाणे पट्यात काही जागांवर मनसेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. विक्रोळी, मुलुंड, मागठाणे , भिवनदी, दादर-माहीम ,ठाणे ,शिवडी, डोबिवली, आणि कोथरूड, या मतदार संघात मनसेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडी विरोधात आक्रमक प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात य उतरवता राज ठाकरेंनी भाजप विरोधात प्रचारात रंगत आणली होती. 

ह्यावेळीच्या विधानसभेत मनसे आघडीसोबत सहभागी होणार अशी चर्चा राज्यभरात होती. मात्र मनसेनं काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीसोबत न जात स्वबळावर निवडणुका लढविल्या . मात्र काही जागांवर आघाडीकडून मनसेच्या उमेदवाराला ताकद देण्याच काम पडद्या मागून झालं होत. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलेलं असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचं सरकार राज्यात आलं आहे. सरकारच्या बहुमत चाचणी वेळीही मनसेचे तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती चर्चा होण्याची शक्यता आहे.