भारताने पाकिस्तानला दिला मोठा धक्का

0
59
india-pakistan

मुंबई : काही दिवसापूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने भारतावर जोरदार टीका केली होती. यावेळी पाकिस्ताच्या क्रिकेट मंडळाने बीसीसीआयबरोबर पंगा घेतला होता. पण बीसीसीआयने आता पाकिस्तानला जबर चपराक लावली आहे. बीसीसीआयने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे, यावर पाकिस्तान नेमके काय करणार , याची उत्सुकता सर्वाना असेल. 

 

पाकिस्तान बरोबर आम्ही द्विदेशीय सामना खेळणार नाही, हे ह्यापूर्वीच स्पष्ट केले होते. याचबरोबर पाकिस्तान मध्येही खेळायला जाणार नाही, हेदेखील ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे कोणतीही मोठी स्पर्धा पाकिस्तान मध्ये घ्यायला आयसीसी धजावत नाही. आणि आता तर बांग्लादेश मध्येही पाकिस्तान सोबत  खेळणार नाही. असा निर्णय बीसीसीआयचे घेतला आहे. 

 

बांगलादेश क्रिकेट मंडळाचे संस्थापक शेख मुजीब उर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. त्यामुळे एशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेवन यांच्यामध्ये ट्वेंटी -२० सामना खेळण्यात येणार आहे. पण भारताने या सामन्यासाठी एक अट घातली आहे. आणि हि अट  जर मान्य केली तर पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे. 

यावेळी एशिया इलेवन हा संघ निवडण्यात येणार आहे. यामध्ये आशियातील सर्वोत्तम संघाची निवड करण्यात येणार आहे. पण या आशियातील संघात एकही पाकिस्तानचा खेळाडू नसावा, अशी अट बीसीसीआयने ठेवली आहे . आणि जर या संघात पाकिस्तानचा एकही खेळाडू असेल तर भारताचा एकही खेळाडू या सामन्यात खेळणार नाही. अशी कठोर भूमिका बीसीसीआयने घेतली आहे.