इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात जगामध्ये भारताचा प्रथम क्रमांक

0
65

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात जगामध्ये भारताचा प्रथम क्रमांक 

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार घटना घडून सार्वजनिक मालमतेचे नुकसान झाले आहे . कोणतेही आंदोलन असताना परीस्थिती चिघळू नये, कोणत्याही अफवा पसरू नये यासाठी सरकारकडून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतले जातात. 

इंटरनेट बंद करण्यामध्ये जगभरातून भारताचा पहिला क्रमांक लागत असल्याचे माहिती इंटरनेट शटडाऊन्स डॉट एन अहवालानुसार समोर आले आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतामध्ये २०१२ पासून आतापर्यंत ३६७ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जागतिक स्तरावर खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट पैकी भारतातील संख्या ६७ %   आहे. 

२०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १३४ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्या . जगाच्या तुलनेत भारतात इंटरनेट बंद कार्यात आलेल्या घटनांची संख्या सर्वात अधिक होती. तसेच जम्मू काश्मीर मध्ये गेल्या ८ वर्षात सर्वाधिक वेळा इंटरनेट सेवा बंद केली होती. 

जम्मू काश्मीर मध्ये सुमारे १८० वेळा इंटरनेट सेवा  बंद करण्यात आली. दहशदवादी कारवाया आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू -काश्मीरमधून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. २०१२ मध्ये ३ वेळा, २०१३ मध्ये ५ वेळा, २०१४ मध्ये ६ वेळा, २०१६ मध्ये ३१ वेळा , २०१७ मध्ये ७९ वेळा २०१८ मध्ये १३४ वेळा आणि २०१९ मध्ये ९५ वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली . 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हान यांनी देखील बंद ठेवण्यात भारताचा या वर्षी जगात पहिला नंबर असल्याचे सांगत ट्विट केले आहे.