भाजप रणनीतीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता : सलग पाच पराभवनंतर आता “ काँग्रेस पॅटर्न “

0
89

नवी दिल्ली/ रांची : झारखंड विधानसभा निवणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. याचमुळे हिंदी पट्यातील आणखी एका राज्यातील सत्ता भाजपला गमवावी लागली आहे. या पराभवाची चाहूल भाजपला लागलीच होती. तरीही पक्ष राज्यातील सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांना होता. मात्र झारखंड मुक्ती मोर्चाने मुसंडी मारत राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याची किमया साधली. आणि याच मुले आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवणाऱ्या आणि २०१४ पेक्षा जास्त जागा जिकणाऱ्या भाजपने मुख्यमंत्री बद्दलची रणनीती बदलण्यासंदर्भात विचार सुरु केलाय. मुख्य मंत्र्यांना स्वातंत्र्य देण्याची भूमिका नेतृत्वाने घेतली होती. त्यामुळे सरकारचे निर्णय, तिकीट देण्याचे-कापण्याचे अधिकार, आघाडी करण्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मुख्यमंत्र्याना देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकद उभी करण्याचं काम भाजप कडून करणात आलं. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये होणारे पराभव पाहता या रणनीतीचा भाजप कडून पुनर्विचार केला जाऊ शकतो. 

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याकडे मर्यादित अधिकार असतात. त्याचे बरेचसे निर्णय दिल्लीतूनच होतात. याशिवाय दिल्लीतून मुख्यमंत्र्यावर अंकुशपण ठेवला जातो. पण भाजपचे धोरण याच्या अगदी उलट आहे. भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य देत त्याचं सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेत. पण याचे काही प्रतिकूल परिणाम समोर येऊ लागेलत. कोणाचेच आव्हान नसल्यामुळे काही मुख्यमंत्र्यांना गची बाधा झाली. त्यामुळे पक्षला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भाजप नेतृत्वाकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांना काही प्रमाणात कात्री लावली जाऊ शकते. आणि असं झाल्यास भाजपात काँग्रेस पॅटर्न पाहायला मिळेल.