भारतातील पहिले केंद्र : कोल्हापुरात घडणार खेळाडूंचे शरीर आणि मनही

0
76
new palace

भारतातील पहिले केंद्र : कोल्हापुरात घडणार खेळाडूंचे शरीर आणि मनही 

कोल्हापूर: खेळाडूचे शरीर आणि मन तंदरुस्त आणि  मजबूत करण्याचे अत्याधुनिक प्रक्षिशण केंद्र ‘द ब्रीज ‘ येत्या सोमवार पासून कोल्हापुरात सुरु होत आहे. येथील सावली केअर सेंटरने उभारलेले हे अशा प्रकारचे देशातील पहिलेच केंद्र आहे. 

कोणत्याही स्पर्धेत यश मिळवण्यासाठी केवळ क्रीडा कौशल्य असून चालत नाही, ते त्यासाठी शरीर आणि मन मजबूत असावे लागते. आपल्याकडे नेमकी त्याचीच उणीव जाणवते. ती भरून काढण्यासाठी , तसेच सर्व प्रकारचे प्रशिक्षण एकाच छताखाली दिले जावे यासाठी हे केंद्र सुरु केल्याची माहिती सावली सारे सेंटरचे संचालक किरण देशपांडे यांनी दिली. 

आपल्याकडे गुणवत्ता कमी नाही , क्रीडाकौशल्यहि कमी नाही. पण शरीर तंदरुस्त किंवा मानसिक कणखरपणा यामध्ये आपले खेळाडू कमी पडतात. याची करणे शोधताना भारतात क्रीडा अकादमी भरपूर आहेत. पण तेथे फक्त खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. बहुतांशी खेळाडूंना एकच प्रशिक्षक असतो तोही पूर्वाश्रमीचा खेळाडू असतो . फिजीओनं गरजेप्रमाणे बोलावून घेतले जाते . असे आढळून आले अनेक खेळाडू अत्याधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्ररदेशात जातात. मात्र आर्थिकदृष्ट्या सपंन्न खेळाडूंनाच हे शक्य होते. गुणवत्ता आहे, पण आर्थिक परिस्थिती नाही म्हणून अनेक खेळाडूंची गुणवत्ता मारली होते. असे होऊ नये यासाठी आंतरराष्टीय दर्जाची प्रशिक्षण आपल्या इथेच एकाच छताखाली का देऊ नये या विचाराने ‘ द ब्रीज या स्टेप टूवर्ड्स स्पोर्ट्स एक्सलन्स ‘ या प्रकल्पांतर्गत हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. 

कोणत्याही खेळाडूला संबंधित क्रीडा प्रकार , शारीरिक , मानसिक ,वैद्यकीय आन आहार या पाच प्रकारचे प्रशिक्षण गरजेचं असते. या केंद्रात संबंधित खेळाचा प्रशिक्षक नसेल मात्र तज्ञ सायकॉलिजिस्ट , फिजिओथेरपिस्ट , फिजिशिअन आणि न्यूट्रिशन असे चार तज्ञ प्रशिक्षक डॉ. त्या खेळाडूंची गरज ओळखून त्याला हवे तसे घडवतील. मान्यताप्राप्त ५३ क्रीडा प्रकार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकारची गरज वेगवेगळी असते. हि गरज ओळखून खेळाडूंनी प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना तो ज्या प्रकारचा खेळतो त्याचे प्रशिक्षण दिले जाणार नाहीं, मात्र सरावाची सोय करून दिली जाणार आहे.  

 

  • प्रवेशाची अट 

या अत्याधनिक प्रशिक्षण केंद्रात निकष पूर्ण करणाऱ्या आणि किमान जिल्हा स्तरावर खेळल्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. 

  • हवामानानुकूल प्रशिक्षण 

बऱ्याच वेळा आपल्या खेळाडूंना युरोप, अमेरिकेतील थंड हवामानात आपली कार्यक्षमता टिकवणे कठीण होते  यामुळे यशाचे प्रमाण कमी होते. यावर मत करण्यासाठी भविष्यत कोणत्याही हवामानात कशी कार्यक्षमता उंचावण्यात येईल याचे प्रशिक्षण देणारी व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. 

 “भारतातील गुणवत्तापूर्ण खेळाडूचे शरीर आणि मन घडवण्याचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाणार आहे. येथे प्रशिक्षण घेतलेले खेळाडू येत्या जुलै , ऑगस्टमध्ये जपानमध्ये होणाऱ्या औलम्पिक स्पर्धेत नाही: मात्र २०२४ च्या औलम्पिक स्पर्धेत निश्चितपणे दिसतील आणि यश मिळतील. असा मला ठाम विश्वास आहे. 

  • किशोर देशपांडे , संचालक