चुकीच्या गोळ्या खाल्याने बालकाचा दुर्देवी मृत्यू

0
91
daeth photo

चुकीच्या गोळ्या खाल्याने बालकाचा दुर्देवी मृत्यू 

 कोल्हापूर : चॉकलेट समजून उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्याने अजनारी [ ता. लांजा ] येथील दोन वर्षाच्या चिमुकल्यांचा रविवारी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. सार्थक सूर्यकांत पेंढारी असे या चिमुकल्यांचा नाव आहे. मनाला चटका लावणाऱ्या घटनेमुळे सीपीआर मध्ये हळहळ व्यक्त होत होती. 

घरातील खोलीमधील एका कोपऱ्यात उंदीर मारण्यासाठी काही गोळ्या ठेवल्या होत्या. इकडून तिकडे दुडदुडत असताना त्यापैकी काही गोळ्या सार्थकने तोंडात टाकल्या. शुक्रवारी [ १३ डिसेंबर]सकाळी हि घडली. काही वेळानंतर त्याला उलट्या, जुलाबाच्या त्रास सुरु झाला. 

प्रकृती गंभीर बनल्याने त्याला लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. ती खालावत राहिल्याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . अतिदक्षता विभागात सार्थकवर उपचार सुरु होते. आणि शेवटी दुपारी त्याचे निधन झाले.सार्थकच्या मृत्युने त्याच्या मातेने हंबरड्याने साऱ्यांची मने हेलावून गेली.