आयपीएल लिलावामध्ये : कमिन्स सर्वात महागडा खेळाडू

0
77

आयपीएल लिलावामध्ये : कमिन्स सर्वात महागडा खेळाडू 

कोलकता : आयपीएलच्या १३ हंगामासाठी लिलाव कोलकता येथे कोलकता येथे गुरुवारी पार पडला. यामध्ये ऑस्टेलियाचा जलदगती गोलंदाज पँट कमिन्स इतिहास रचला. कोलकता नाईट रायडर्स संघाने त्याला १५. ५० कोटीला आपल्या ताफ्यात घेतले. कमिन्स साथीदार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने १०. ७५ कोटीला आपल्या ताफ्यात घेतले. एकूणच या लिलावावर ऑस्ट्रेलिया आणि  इंग्लंडच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले 

२ कोटी आधारभूत किंमत असलेल्या पँट कमिन्स जेव्हा लिलावासाठी आला तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली कॅपिट्ल संघामध्ये चांगली चुरस हि पाहायला मिळाली. दोन्ही फ्रेंचायजीनी हि किंमत १४. ५० कोटी पर्यंत नेली. मात्र, खूप काळ बोलीपासून दूर राहिल्यानंतर अचानक कोलकता नाईट रायडर्सने १५ कोटीची बोली लावली. व या खेळाडूला १५. ५० कोटीला आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्यातरी विदेशी खेळाडूवर इतकी बोली लावण्यात आली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला १० कोटींना आपल्या ताफ्यात घेतले. विकेट मिळवल्यानंतर आपल्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या वेस्ट इंडिजच्या शेल्डन काँट्रेलला ८ . ५० कोटींना किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या संघात घेतले. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर – नाईटला मुंबई इंडियन्स संघाने ८ कोटीला घेतले. सध्या सुरु असलेल्या भातराविरुद्धच्या मालिकेत आपल्या आक्रमक फलंदाजीने लक्ष वेढलेल्या वेस्ट इंडिजच्या शेमरॉन हेटमायरला ७. ७५ कोटींना दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतले. तर, चेन्नई सुपर किंग्स संघाने पीयूष चावलाला आश्चर्यकारकरीत्या ६ ७७ कोटीला संघात घेतले व अष्टपैलू खेळाडू सॅम करन ५. ५० कोटीला चेन्नईकडे गेला. 

  • युवामुंबईकरजैस्वालराजस्थानरॉयल्सकडे

भारताच्या १९ वर्षाखालील गटातील सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या युवा मुंबईकर खेळाडू यशस्वी जैस्वालला देखील य लिलावात चांगली रक्कम मिळाली. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने २ कोटी ४० लाखांना आपल्या भात्यात घेतले. त्याने मुंबईत राहून क्रिकेटचे धडे गिरवले . तसेच त्याने अष्टपैलू कामगिरी करीत चमक दाखवली.