जयसिंगपुरमध्ये पाच दुकाने फोडली

0
60

जयसिंगपुरमध्ये  पाच दुकाने फोडली

शिरोळनंतर जयसिंगपूर शहरात सांगली-कोल्हापूर महामार्गालगत पालिकेच्या गाळ्यातील पाच दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला. एका भांडी दुकानातील रोकड, कॅमेऱयांसह सीसीटीव्ही ची सर्व यंत्र सामग्री लंपास केली. अन्य लागून असलेल्या चार – पाच दुकानातील किरकोळ दीड हजारांपर्यंची रक्कम लंपास केली. 

सांगली -कोल्हापूर महा मार्गावर पालिकेच्या गाळ्यात परिवार स्टील सेंटर , मी  . आरबाळे ब्रदर्स किराणा दुकान, रॉयल ड्रायक्लिनर्स , गणेश भांडी दुकान यासह विकासिनी एन्टरप्राइजेस , मारुती स्टील सेन्टर , सौरभ कम्युनिकेशन, नेरोलॅक पेंट. अशी दुकाने पालिकेच्या गाळ्यात आहेत. परिवार स्टील सेंटरसह सर्व दुकानात चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. गणेश भांडी दुकानात चोरट्याच्या हाताला सातशे ते आठशे रुपये तर अन्य दुकानात किरकोळ रोकड चोरीस गेली. केवळ एका दुकानदाराने फिर्याद दिली आहे. 

चोरटयांनी तीन क्रमांकाच्या गाळ्यात असलेल्या परिवार स्टील सेंटरची कौले काढून पोट माळ्यावर प्रवेश केला. माळ्यावर १० किलो तांब्याची भांडी तसेच खाली दुकानात काउंटर वरील बाजूस असलेले जाळीची फ्रेम उचकटून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मशीन व व्यापाऱ्याला देण्याकरिता ठेवलेली रोकड ७ हजार रुपये असा एकूण २० ते २२ हजार रुपयांचा मुद्दे माल पळविला. लगत असलेल्या आरबाळे किराणा दुकानातील कौले चोरटयांनी काढली. मात्र, खाली छताला फळ्या असल्याने चोरीचा प्रयत्न फसला. 

पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा केला. परिवार स्टील सेंटरचे मालक संजय जनादर्न पाचंगे. [ वय ३२ , या ११ वि गल्ली , शिवाजी चौक, जयसिंगपूर ] यांनी फिर्याद दिली आहे. पाचंगे म्हणाले, नुकतेच सीसीटीव्ही मध्ये ४ हजाराची रेकॉर्डिंगसाठी नवी डिस्क घातली होती. १० किलो वजनाचे तांब्याचे ताम्हण असलेले पोटे चोरटयांनी पळविले.