बीड : धक्कादायक : पत्नीची हत्या करून प्रेताचे तुकडे ठेवले फ्रीजमध्ये

0
66
murder

बीड : धक्कादायक : पत्नीची हत्या करून प्रेताचे तुकडे ठेवले फ्रीजमध्ये 

माजलगाव शहरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा सापडला होता. या धक्कादायक प्रकारचे गूढ उकलले आहे.  सततच्या भांडणास कंटाळून घरात पत्नीची हत्या करून प्रेताचे तुकडे फ्रीजमध्ये ठेऊन तब्बल दहा दिवस तो प्रेतासोबत दोन मुलांना घेऊन राहिला. हा धक्कादायक प्रकार माजलगाव शहरातील अशोकनगर या भागात घडला आहे. अखेर दहाव्या दिवशी हा खुनाचा प्रकार उघडकीस आला आणि पतीच्या हातात बेड्या पडल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे या इंदिरानगर भागात  राहणारी रेश्मा पठाण यांचे कॉलेज जीवनापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी घरच्यांचा विरोध डावलून लग्न केले संसार थाटला. संजय याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता व अब्दुल रहमान या नावाने फातेमानगर मंजरथ रोड येथे राहत होता. या दाम्पत्यास दोन मुले होती. 

सोमवारी सकाळी अशोकनगर नाल्याकडेला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये आरोपी संशयित स्थितीत दिसून आला. 

तसेच आरोपीची पत्नी रेश्मा मागील आठ दिवसापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळले. त्यावरून पोलीस निरीक्षक संजय साळवे यास ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली. त्यातून त्याने आठ दिवसापूर्वी [ ३० नोव्हेबंरला ] पत्नीची धारधार शास्त्रास्तने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली    असता हा गंभीर प्रकार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनीही घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.