कोल्हापूर : गॅस सिलिंडर स्फोटात युवकाचा मृत्यू , दोघे जखमी

0
155

कोल्हापूर : गॅस सिलिंडर स्फोटात युवकाचा मृत्यू , दोघे जखमी 

सरवडे  : कोल्हापूर जिल्ह्यातील खिंडी व्हरवडे [ ता. राधानगरी ] येथे गॅस सिलिंडरचा [ कार्बोइड ] स्फोट झाला आहे. या स्फोटात सागर दिलीप करपे [ वय १७ ] याचा मृत्य झाला आहे. तर बाजीराव करपे, दिलीप करपे हे दोघे जखमी झाले आहेत. खिंडी व्हरवडे तेथील शिवशंभो वेल्डिंग वर्क्स मध्ये झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात सागर दिलीप करपे [ रा . चक्रेश्वरवाडी] वय १७ या कॉलेज युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील डिलिपो करपे व चुलते बाजीराव करपे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी , चक्रेश्ववरवाडी येथील दिलीप करपे व बाजीराव करपे याचे राधानगरी कोल्हापुर राज्य मार्गावरील खिडी व्हरवडे शिवशंभो वेल्डिंग वर्कशॉप आहे . सकाळी ११. ३० ला सागर करपे जेवणाचा डब्बा देण्यासाठी वर्कशॉप मध्ये गेला होता. त्याचे वडील व चुलते गॅसचे काम करत होते. त्यावेळी कार्बाइड सिलिंडरच्या अचानक स्फोट होऊन त्यामध्ये सागर जागीच ठार झाला. तर वडील दिलीप व चुलते बाजीराव करपे जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक उदय डुबल करत आहे. 

 

  • सहल अर्ध्या वरच राहिली 

सागरची उद्या शालेय सहल होती. त्यामुळे वडिलांना भेटून व जेवणाचा डब्बा देऊन यायचे असा बेत होता. परंतु नियतीने शाळेची सहल रद्द करून विना परतीची कायमची सहल घडवली.  कुटुंब व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.