शहिद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

0
95

कोल्हापूर : शहीद जवान जोतिबा चौगुले याच्या पार्थिवावर आज उंबरवाडी येथे पोलीस आणि लशंकराच्या प्रत्येकी आठ जणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली . 

शहीद जवान जोतिबा चोगुले याचे पार्थिव आज बुधवारी साडे – सात वाजता. हरळी येथे पोहोचले. या ठिकानाहुन लष्कराच्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्य यात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ, विध्यार्थी- विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. 

“ अमर रहे अमर राहे जोतिबा चौगुले अमर राहे, भारत माता कि जय, वंदे मातरम “ अशा घोषणा देत हि अंत्ययात्रा महागाव येथे पोहचली. येथील फुलांनी सजवलेल्या वाहनातून हि अंत्ययात्रा उंबरवाडी येथील निवास स्थानी आली. या ठिकाणी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्याचे पार्थिव ठेवण्यात आले. वडील गणपती चौगुले, आई वत्सला , पत्नी यशोदा, आणि नातेवाईकानी दर्शन घेतले. 

रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौका -चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. 

हि अंत्ययात्रा अंतिम संस्कारांच्या ठिकाणी आल्यानंतर खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, यांनी पार्थिवाला पुष्प चक्र वाहिले, जिल्हाधिकारी देसाई यांनी वीरमाता , वीरपिता ,वीरपत्नी यांची भेट घेऊन सांत्वन केली. 

प्रांताधिकारी विजय पांगारकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने , तहसील दार दिनेश पारगे, कर्नल संजीव शौरी , कर्नल संजय शिंदे, लेफ्टनंट सी. बी, एस, सुभेदार मेजर जयवंत नगरे, आदींनी पार्थिवाला पुष्पचक्र वाहून मानवंदना देऊन आदरांजली वाहिली. 

माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, पंचायत समिती सभापती विजय पाटील यांच्यासह आजी-माजी लष्कराचे जवान, ग्रामस्थ आणि लष्कराच्या प्रत्येकी आठ जवानाच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकी ३ फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. 

  यानंतर शहीद जवान जोतिबा चौगुले याचा मुलगा अथर्व  अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी , अधिकारी, पदाधिकारी, त्याचबरोबर कोल्हापूर, बेळगाव येथून लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी आणि हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.