कोल्हापूर उपनगरात सोमवारी पाणीपुरवठा खंडित

0
75
kolp

कोल्हापूर उपनगरात सोमवारी पाणीपुरवठा खंडित 

चंबुखडी टाकीकडून आपटेनगरकडे जाणाऱ्या १८ इंची पाइपलाईची गळती काढण्याचे काम सोमवारी [ दि . २३ ] रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी शहरातील ए वॉर्ड आणि त्यास संलग्नित उपनगरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारी [ दि २४] तारखेला अपुरा पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. 

ए वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे आणि ग्रामीण भाग यासह फुलेवाडी परिसर, फुलेवाडी रिंगरोड, साने गुरुजी वसाहत, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कनेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी , देवकर पाणंद आदी परिसरातील पाणीपुरवठा याकामाचा परिणाम होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.