के एस.ए वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा : बालगोपाल ची दिलबहार ‘ अ ‘ वर मात

0
62

के एस. ए .वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा : बालगोपाल ची दिलबहार ‘ अ ‘ वर मात 

 कोल्हापूर: के. एस.ए वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा २-१ असा पराभव केला , तर मंगळवार पेठ फुटबॉल क्लब व उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील लढत गोल शून्य बरोबरीत राहिली . 

छत्रपती शाहू स्टेडियम सुरु असलेल्या या स्पर्धेत बुधवारी दिलबहार ‘ अ ‘ व बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात लढत झाली. पूर्वार्धात दोन्ही संघानी वेगवान चाली रचल्या. त्यात नवव्या मिनिटाला ‘ बालगोपाल ‘ कडून रोहित कुरणेच्या पासवर अभिनव साळोखेने पहिला गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले , मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.

पाठोपाठ’ दिलबहार’ च्या रोमॅरिक याने ३२ व्या मिनिटाला मैदानी गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली . सामन्याच्या ३५ व्य मिनिटास दिलबहार संघाच्या बचाव फळीतील खेळाडू पवन माळीच्या डोक्याला चेंडू लागून थेट गोल जाळ्यात गेला. त्यामुळे दिलबहार, ‘ अ ‘ वर स्वयंगोल झाला. त्यामुळे सामन्यात बालगोपाल संघाने २-१ अशी आघाडी घेतली. 

उत्तरार्धात दिलबहारच्या जावेद जमादार , सनी सणगर , रोमॅरिक  व सुशांत अतिग्रे यांनी आक्रमक चढाया केल्या, तर ‘ बालगोपाल ‘ कडून वैभव राऊत, सुरज जाधव व रोहित कुरणे यांनी आघाडी वाढविण्यास प्रयत्नात सातत्य ठेवले, मात्र दिलबाहारच्या सजग गोलरक्षक व बचावफळीने तो परतावून लावला. प्रति आक्रमणात बालगोपालच्या वैभव राऊत याने मारलेला फटका गोल पोस्टरला लागून मैदानाबाहेर गेला. अखेर २-१ या गोल संख्येवर ‘ बालगोपाल ‘ ने सामना जिंकत तीन गुणांची कमाई केली. 

मंगळवार पेठ फ़ुटबाँल क्लब व उत्तरेश्वर प्रासादिक यांच्यात झालेली लढत संपूर्ण वेळेत गोल शून्य बरोबरीत राहिली. 

मंगळवार पेठेकडून आदित्य लाड, नितीन पवार, ऋषिकेश पाटील, अक्षय माने, यांनी गोल करण्याचे प्रयन्त केले, मात्र , त्यांना समन्व्य नसल्याने गोल करता आले नाहीत, तर उत्तरेश्वर संघाकडून लखन मुळीक, अजिक्य सुतार, अक्षय मंडलिक, यांनी आक्रमक खेळ केला, मात्र, दोन्ही संघात समन्व्य नसल्याने शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही. अखेरीस हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने दोन्ही प्रत्येकी एक गुण  देण्यात आले. 

हंगामातील पहिले रेडकार्ड 

उत्तरेश्वर प्रासादिक संघास गोल करण्याची संधी होती. मात्र जाणीवपूर्वक मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा खेळाडू आदित्य लाड याने चेंडू हाताने अडविला. त्याला पंच संदीप पोवार यांनी रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. यासह त्याला शिक्षा म्हणून पुढील एक सामना खेळाता येणार नाही. आदित्यला पंचानी दिलेले हे हंगामातील पहिले रेडकार्ड ठरले.