वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सुरु ;

0
88
solar eclipse

यंदाच्या वर्षा मधील  शेवटचे सूर्यग्रहण दिसू लागले आहे. देशाच्या बहुतांश भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण  दिसण्यास सुरुवात झाली आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आल्यानं विलोभनीय दृश्य दिसू लागलं आहे. गुजरात मधल्या द्वारका भागातून सर्वप्रथम ग्रहण दिसण्यास सुरुवात झाली. तामिळनाडू, केरळ, ओदिशा  या भागातून कंकणाकृती ग्रहण दिसू लागलं आहे. तर उर्वरित भारतात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. 

 

पडद्यावर चंद्र – सूर्यामधील लपंडावाचा महासोहळा सुरु झाला असून त्याच ‘ मध्यांतर ‘ म्हणजे चंद्राने सूर्याला जास्तीतजास्त झाकण्याची अवस्था. सकाळी ९ . २२ ला तर शेवट [ मोक्ष ] सकाळी १०. ५५ ला होणार आहे. हा खेळ सावलीचा दोन तास ५१ मिनिटे असणार आहे. यात सांगली, कोल्हापूर मधून हे ग्रहण ८४ % दिसेल. केरळ, कर्नाटक, व तामिळनाडूतील काही भागातून ते पूर्णतः दिसत असून उर्वरित भारताच्या ग्रहणपट्याच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील भागातून मात्र ते ‘खंडग्रास ‘ दिसणार आहे. 

 

सौदी अरेबिया , कतार , दक्षिण भारत, व इंडोनेशिया येथील भूप्रदेशावरून ११८ रुंदीचा प्रतिछायेचा पत्ता जात असल्याने येथून सूर्यबिंब कंकणाकृती दिसेल. सूर्यग्रहणासाठी अमावस्येची तिथी [ सूर्य -पृथ्वीच्या मध्ये चंद्र अशी स्थिती] शिवाय तिन्ही आकाशस्थ गोल सरळ रेषेत येणे गरजेचं असते. पृथ्वी- चंद्र हे गोल स्वयंप्रकाशित नसल्याने, सूर्यप्रकाशामुळे त्याच्या मोठ्या सावल्या अंतराळात सदोदित पडलेल्या असतात. जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. तेव्हा गडद सावलीच्या पट्यातील लोकांना चंद्रबिंबाच्या आड सूर्य पूर्णपणे झाकलेला म्हणजेच खग्रास दिसतो: तर विरळ पट्यातून त्याचा काही भाग ग्रासलेला म्हणजेच खंडग्रास ] दिसतो. 

 

चंद्र पृथ्वी पासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावस्येची तिथी व हे तिन्ही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण ‘ घडते, पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बागडीप्रमाणे दिसतो.या खगोलीय घटनेस कंकणाकृती सूर्यग्रहण ‘ असे म्हणतात.