लातूर : तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थ्यांची उडी

0
62

लातूर : तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थ्यांची उडी ? 

शुक्रवारी सकाळी शाळेच्या तिसऱ्या  मजल्यावरून एक विद्यार्थी खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या विद्यार्थ्यास लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव येथील श्री महादेव विद्यालयाचा  हा विद्यार्थी आहे . इयत्ता आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांचे नाव रोहित शृंगारे असे आहे.

शाळा भरण्याची घंटा झाली. सर्व विध्यार्थी प्रार्थनेसाठी जात असताना सदर विद्यार्थ्याने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ? कि पडला अशी चर्चा शाळा परिसरात होती. तो गंभीर जखमी झाला असून , दोन्ही पाय मोसल्याने वलांडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रोहित शृंगारे हा नळेगावचा असून, तो बोळेगांव येथे आजोळी राहतो. यावर्षी त्याने या शाळेत प्रवेश घेतला आहे. शिवाय धनेगाव येथील शासकीय वसतिगृहात राहतो

  • तो कसा पडला ? 

शाळेत विद्यार्थी संख्या जास्त आहे. तो तिसऱ्या मजल्यावर का गेला? उडी मारली, कि तो पडला ? शाळेचे नियंत्रण कसे नाही ? शाळा सुरु असतानाही बहुतांशी विद्यार्थी बाहेर कसे काय फिरतात ? असे अनेक प्रश्न उपस्थितातून पुढे येत होते.

  • कारण कळाले नाही : मुख्यध्यापक 

सदरचा विद्यार्थी हा वसतिगृहात राहतो. पण तो कसा काय पडला याचे कारण अद्यापही कळाले नाही . त्यावर उपचार होणे व तो बारा होणे महत्वाचे आहे. पडण्याचे कारण शोधले जाईल असे शाळेचे मुख्याध्यापक रामलिंग मुळे यांनी सांगितले.