महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंत्रिमंडळाची मान्यता

0
84
NPIC

 

मुंबई : नैसर्गिक आपत्तीने यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कर्जमाफीची घोषणा केली होती. दरम्यान महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

 

या योजने नुसार १ एप्रिल २०१५ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम २ लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास २ लाख पर्यंत कर्जमुक्ती लाभ देण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी अल्प मुदतीत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात अशा शेतकयांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत लवकरच नवीन योजना जाहीर करण्यात येईल.

 

 अतिवृष्टी व अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेकऱ्यासाठी विधि मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्याचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. तसेच या योजनेला महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.