CAA Protest ; मराठवाड्यामध्येही हिंसक वळण : जाळपोळीच्या घटना

0
84
CAA against

CAA Protest  ; मराठवाड्यामध्येही हिंसक वळण : जाळपोळीच्या घटना 

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधातील आंदोलनांची  धार राज्यातही तीव्र झाली असून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही ठिकठिकाणी निघालेल्या मोर्च्यांनी महाराष्ट्र दणाणून गेला आहे. मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले . 

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीड पोलिसांनी जमत पांगवण्यासाठी अश्रूच्या नळकांड्या फोडल्या . यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. औरंगाबाद आणि नांदेड मध्ये मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शांततेत आंदोलन झाले. आंदोलनासाठी नागरिक उस्त्फुर्तपणे रस्त्यावर उतरले होते. त्यातही तरुणाची संख्या लक्षवेधी होती. 

औरंगाबादेत विविध मुस्लिम आणि दलित संघटनांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. या मोर्चात अक्षरशः जनसागर उसळला होता. शहरात कडकडीत बंद होता . बीड मंडे मोर्चेकर्त्यानी बस वर दगडफेक केली. पोलिसांनी अश्रुधाराच्या ४ नळकांड्या फोडल्या. यात ८ ते १० होमगार्ड तसेच पोलीस जखमी झाले. 

कळमनुरी येथे ४ एसटी बसेस फोडल्या. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले. दुपारी नवीन बसस्थानकासमोर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधाराचे नळकांडेही फोडले. त्यानंतर जमाव पांगला  गेला. दिवसभर शहरात कडकडीत बंद होता. परभणी जिल्ह्यात पाथरी, पूर्ण, पालम येथे मोर्चा काढण्यात आला. परभणी शहरात मोर्चेकरी परतत असताना काही जणांनी मनपाच्या अग्निशामक दलाच्या गादीवर [ पण १२ वे] दगडफेक केली. दुचाकी वाहनाचेहि नुकसान केले. 

नांदेड मध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले हजारोच्या संख्येने नागरिकांनी तब्बल सव्वातीन तास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठाण मांडला होता. लातूर जिल्हातील निलंगा , औराद शहाजानी आणि किनगाव येथे मोर्चा काढण्यात आला निलंगा येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे , कोल्हापूर , मिरज , सोलापूर, फलटण येथे आंदोलन झाले. मिरजेत संविधान बचाव कृती समितीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम कार्यकर्ते उस्फुर्तपणे हजारोच्या संख्येने मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पुण्यात निघालेल्या मोर्चात आंदोलकांनी ‘ भारत मैं  हूं किराएदार नाही बराबर के हिस्सेदार है । ‘ सेव्ह कॉन्टिट्यूशन रिजेक्ट कॅब ‘ असे लिहिलेले फलक हातात धरले होते. 

अहमदनगर शहर, संगमनेर, राहता, कोपरगाव, जामखेड, शहरात संविधान बचाओ मोर्चा काढण्यात आला. खान्देशात जळगाव, भुसावळ, अमळनेर,जामनेर, धुळे व शहाद्यात मोर्चा काढण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि माणगाव येथे तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतहि आंदोलन झाले. 

  • नागपुरातही प्रचंड मोर्चा 

मुस्लिम समाजाचा लक्षवेधी रोष नागपूरकरांनी अनुभवला . हिवाळी अधिवेशनानिमित्य सरकार नागपुरात असताना आंदोलनासाठी प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. मुस्लिम समाजाची हि वज्रमूठ साकारला एक इशारा असल्याची भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.