राज्यात दुधाचा तुटवडा : दरवाढीचे संकट ।

0
76
milk

राज्यात दुधाचा तुटवडा : दरवाढीचे संकट । 

मुंबई : 

दरवर्षी सप्टेंबर महिन्यानंतर दुधाचे उत्पन्न वाढून बाजारात मुबलक पुरवठा होत असतो. यंदा मात्र राज्यात गेल्या १० दिवसापासून दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. उत्पादन कमी असल्याचा हा परिणाम असल्याने हे दरवाढीचे संकट भेडसावत  आहे. 

राज्यात सरासरी १. ४० कोटी लिटर दुधाची गरज असताना सध्या दररोज १ . १० कोटी लिटर दुधाचेच संकलन होत आहे. त्यामुळे सद्य स्थितीत दूध खरेदीचे दर काहीसे वाढले असून, अहमदनगर येथे २९-३० रुपये प्रति लिटर तर कोल्हापूर , सांगली, आणि पुणे तेथे २६ ते २८ रुपये प्रति लिटर दुधाचे दर आहेत. 

पावसाळ्यानंतर दुधासाठी अनुकूल हंगाम सुरु होत असतो, तरीही यंदा तुटवडा जाणवत असल्याचे मत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रजचे मालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी म्हणटले आहे. 

हिरवा चार आणि मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने पावसाळा संपताच दुधाचे उत्पादन वाढत असते.हा दुधाच्या उत्पादनासाठी सुगीचा मानण्यात येतो. मात्र या वर्षी काही भागात दुष्काळ , तर काही भागात महापूर यामुळे दुधाचा हंगाम खऱ्या अर्थाने अद्यापही सुरु झालेला नसून जानेवारीत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. चाऱ्याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे दुग्धोपादकांनी दुभती किंवा गार्भर जनावरे खरेदीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, तुटवडा वाढत आहे. 

महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ९ हजार जनावरे मेली. त्यात भर म्हणजे जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेला नसल्याचे क्षीरसागर म्हणाले.अहमदनगर , नाशिक, पुणे आणि सोलापूर जिल्यात जून अखेरपर्यंत दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे दुधाचे उत्पन्न घटले आहे. यंदाच्या हंगामात मुबलक दूध उपलब्ध होणे दुरापास्त असल्याचे मत ‘ प्रभात ‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मित्रा यांनी व्यक्त केलं आहे.. 

दरम्यान प्रमाणित दूध आणि टोन्ड दूध पावडरच्या स्थानिक आणि आंतरराष्टीय किमतीत काहीशी वाढ झाली आहे. न्यूझीलंड दूध प्रक्रिया क्षेत्रातील मातब्बर कंपनी दूध पावडर खरेदी -विक्रीचा ऑनलाईन व्यवसाय करते. त्यांनी या पंधरवड्याचा दर ३ हजार ६८ डॉलर्स भारतीय मूल्यात २ लाख १८ हजार प्रति टनचा दर नोंदवला आहे. दोन्ही प्रकारच्या दूध पावडरचे दर प्रतिकिलो ३१० आणि ३१५ आहेत. येत्या आधुनिक काळात दुधाच्या दरात दरवाढ अटळ असल्याचा इशारा राज्य दूध संघानी दिला असून सरकारने प्रमाणित दुधाची पावडर आयात करण्याची गरज उद्भवणार आहे असे म्हटले जात आहे.