दुधाचा दर वाढल्याने संकरित गाईंना आला सोन्याचा भाव

0
80

 बारामती : अनेक दिवसापासून जनावरे बाजारातील मरगळ दूर होऊ लागली आहे. सोमवार पासून दुधाची खरेदी दाराच्या २ रुपयाची वाढ जाल्याने बारामती येथील बाजारात गुरुवारी [ दि ; १९ ] जनावरांच्या किमतीमध्ये वाढ झाली. ४० ते ९० हजार दरम्यान संकरित गाईची खरेदी -विक्री झाली. तर , होस्टन, फ्रिजियन जातीच्या एका गाईची विक्री १ लाख १८ हजार रुपयांना झाली. 

आधी दुष्काळी स्थिती, त्यानंतर परतीच्या पावसाचा धुमाकूळ यामुळे चाऱ्याच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली होती. त्यातच दुधाचे दर देखील पडल्याने जनावरे बाजारात मरगळ आली होती, मात्र हळूहळू हि परिस्थिती सुधारत चालली असून सोमवारी जनावरांचा बाजार वधारला. 

सोमव्रपासून दुधाला ३. ५ फॅट ८. ५ एसएनएफ आणि २९. ५० डिग्री असणाऱ्या दुधाला प्रतिलिटर २९ रुपये एवढा खरेदी दर दूध संस्था कडून मिळत आहे. त्यामुळे गुरुवारी बारामतीत बाजारात संकरित गाईच्या किमंतीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली असून. ४० हजारापासून पुढे गाईचे दर मॉल्ट होते. दुग्धव्यवसायासाठी संकरित गाईंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते, जर्शी, होस्टन , फ्रिजियन आदी विदेशी जातीच्या गाईंना शेतकऱ्याची पसंती असते. तसेच या गाई पासून चांगले दुग्धोपादन शेतकऱ्यांना मिळते. 

बारामती तालुक्यसह इंदापूर, दौड , फलटण, पुरंदर, अकलूज, , माळशिरस राशीन आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर व्यापारी व शेतकरी जनावरांच्या खरेदी- विक्रीसाठी बारामतीच्या बाजारात जनावरे दर आठवड्याला दाखल करतात. तसेच, बाजार समितीच्या वाटीनेदेखील येथे विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर आठवड्याला गुरुवारी येथे परिसरातील शेतकऱ्यांची मोट्या प्रमाणात गर्दी होते. 

 

  • दुधाचे दर वाढल्याने बाजारात गाईची आवक आणि दरही चांगलेच राहिले आहेत. त्या तुलनेत म्हशी आणि बैलाची आवक होत नाही. दुग्धव्यवसायासाठीआवश्यकजातिवंतगाईचीआवकदरआठवड्यालाबाजारातहोतअसते.अरविदजगताप सचिव, बारामतीकृषीउत्पन्न बाजार समिती
  • बारामती येथील बाजारात ४०० गाईची आवक झाली होती. या गाईंना ४० ते ९० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला . त्या तुलनेने केवळ २५ हजार म्हशी व १५ खिलारी बैलाची आवक झाली . म्हशींना ४० ते ७५ हजार रुपये तर बैलांना ३५ ते ५५ हजार रुपये इतका दार मिळाला 
  • सध्या ऊस हंगाम सुरु आहे. त्यामुळे कारखाना परिसरात येणाऱ्या ऊसतोडणी कामगारांकडून चांगल्या जातीवंत खिलारी बैलांना मागणी असते, सध्या कारखान्यावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने ‘ मिनी ट्रलऱ ‘ मधून ऊस वाहतूक वाढल्याने बैलाची आवक तसेच किमतीही मोठ्या प्रमाणात घातल्या आहेत.