सावधान । मोबाईल चार्जींगमुळे होऊ शकते बँकेतील रक्कम लंपास , Sbi ने केलं अलर्ट

0
70
USB cable for smartphone.
USB cable for smartphone on wooden background.

सावधान । मोबाईल चार्जींगमुळे होऊ शकते बँकेतील रक्कम लंपास , Sbi ने केलं अलर्ट 

आपण कोणताही रेल्वे स्टेशन , बस स्टेशन  , विमानतळ किंवा अशा कोणत्याही ठिकाणी उभारलेल्या चार्जिंग स्टेशन वापरत असल्यास सावधगिरी बाळगा. या ठिकाणी फोन चार्ज करताना आपल्या मोबाईल मधील महत्वाचा डेटा आणि पासवर्ड हॅक करण्याचा धोका असू शकतो.  हॅकर्स देखील आपला महत्वाचा डेटा हॅक करून आपल्या बँक खात्यातील रक्कम काढू शकतात .. स्टेट बँक ऑफ इंडियाने [एसबीआय ] आपल्या ग्राहकांना याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. 

कोणत्याही  सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनमध्ये फोन चार्ज करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक असलीच स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट केलं आहे. चार्जिंग स्टेशन जवळ हॅकर्स तुमची वाट पाहत असतील आणि तुम्ही  त्याच्या जाळ्यात फसाल . आपल्या फोनचा डेटा काही मिनिटाच्या आत हॅक केला जाऊ शकतो. म्हणूनच विनामूल्य फोन चार्जिंग स्टेशन वापरताना काही गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. 

  • चार्जिंग स्टेशन फोन चार्ज करण्यापूर्वी , चार्जिंग स्टेशनच्या मागे इलेक्टिक सॉकेट टॅप्सने सुनिश्चित करा. 
  • सुरक्षित मार्ग म्हणजे आपली मोबाईल चार्जिंग केबल नेने आणि त्यातून मोबाईल चार्ज करणे 
  • थेट इलेक्टिक आउटलेटच्या मदतीने मोबाईल चार्ज करा. 
  • शक्य असल्यास, आपल्या बरोबर पोर्टेबल बॅटरी चार्जर सोबत ठेवा, आवश्यकतेनुसार मोबाईल चार्ज करा.