आईने जन्म दिला, पण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नवीन आयुष्य दिलं : माजी मुख्यमंत्र्यांची स्तुतिसुमनं

0
102
modi
Prime Minister Narendra Modi in Paris, France August 23, 2019. Michel Spingler/Pool via REUTERS/Files

 जन्म दिला आईने , पण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नवीन आयुष्य दिलं : माजी मुख्यमंत्र्यांची स्तुतिसुमनं 

राजस्थान: एनआरसी आणि सीएए कायद्यावरून देशभरात हिंसाचार उफाळलेला असताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना देवासोबत केली आहे. अफगाणिस्थान , पाकिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिमांना वगळता अत्याचार केलेल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने देशात नागरिकत्व विधेयक कायदा लागू केल्याने त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी देवा पेक्षा कमी नसल्याचे मत शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले. 

राज्यस्थानमधील भाजपच्या एका कार्यक्रमात चौहान म्हणाले कि, देवाने जीवन दिले, आईने जन्म दिला. पण अत्याचार आणि नरकासारखे जीवन जगणाऱ्या लोकांना नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नवीन आयुष्य दिल. आदर आणि सन्मान दिला. त्यामुळे नरेंद्र मोदी देवा पेक्षा कमी नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केल . 

देशामध्ये तीन मुख्य मंत्र्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणार नसल्याची भूमिका आहे. यामध्ये पंजाब, पश्चिम बंगाल आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि छत्तीसगड मध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सुधारित नागरिकत्वाची अंलबजावणीच निर्णय पक्षनेतृत्वाकडे सोपवला आहे. तसेच नेतृत्वात घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी राज्य सरकारकडून केली जाईल, असं कमलनाथ आणि बघेल यांनी म्हटलं होत. पंजाब व मध्यप्रदेशात काँग्रेस ची एकहाती सत्ता आहे.पण महाराष्टातील तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार नव्या कायद्याबद्दल काय भूमिका घेत या कडे देशाचं लक्ष लागून आहे.