मुंबईमध्ये अखेर घनदाट जंगले उभी राहणार ।

0
70

 

मुंबई : महापालिका प्रशासनाने मुंबई मियावाकी पद्धतीने जंगले उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत एक लाखपेखा जास्त झाडे लावण्यात येणार आहे. या जंगल उभारणीस असलेला विरोध मावळल्यामुळे अखेर गुरुवारी जंगल उभारणीस प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या काही महिन्यात भर वस्तीत मुंबई करांना घनदाट जंगल पाहायला मिळणार आहेत. 

 

महाराष्टात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वर्षभरापूर्वी राज्यातील भाजप सरकारने सोडला आहे. याचा आधार घेत, मुंबई शहरात १ लाखापेक्षा जास्त झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे सादरीकरण गुरुवारी स्थायी समितीत करण्यात आले . यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यानी मियावाकि पद्धतीने झाडे उभारण्यास हरकत नाही . पण हि झाडे मैदानावर न उभारता उद्यानामध्ये उभारण्याची मागणी केली तर काँग्रेसच्या असिफ झकेरिया यांनी मुंबई करांना जंगले नको मोकळी उद्याने हवी आहेत. झाडे लावून घनदाट जंगले होतीलही. पण त्यामध्ये जाणे शक्य होणार नाही असे मत झकेरिया यानी  व्यक्त केले. यावर पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी मैदानात झाडे ना उभारता ती उद्यानात उभारण्यात येतील . नागरिकांनी विरोध केला तर अशा ठिकाणी झाडे उभारण्यात येणार नाहीत. एका चौरस मीटरमध्ये किमान ५-६ रोपे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

मियावाकि पद्धतीने लावण्यात येणारी झाडे सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच उभारनाय्त येणार असून लवकरच सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यानी  आक्षेप घेतला. सल्लागार नेमण्यापूर्वीच स्थायी समितीत जंगल उभारण्याचा प्रस्ताव का आणला, याची स्पष्टीकरण करण्याचा आदेश दिला. शेवटी मुंबई पालिकेच्या वतीने लावण्यात येणाऱ्या ५ हजार ९७७ रोपाची लागवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मियावाकी पद्धतीच्या रोपट्यांची लागवडीसाठी मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांची एक, तर पूर्व पुनगरासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेला ३० कोटी ६२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.