राहत्या ठिकाणीही मोजावे लागणार पार्किंगला पैसे

0
94
mumbai

मुंबई: मुंबईत हजारापर्यंत वाढवलेले पार्किंगचे दर कमी करण्याची सुखद वार्ता असतानाच आता तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी तुम्ही गाडी लावल्यास तुम्हला पार्किंगचे पैसे मोजावे लागणार आहेत. हे दर माफक असले , ते हा भूर्दंड येऊ घातल्याने वाहनचालकांच्या खिशाला नियमित चाट पडणार आहे. 

पार्किंग लगतच्या एक कि. मी. परिसरात बेकायदा पार्किंग केल्यास वाहन चालकांकडून १० हजाररुपये दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सर्वच नगरसेवकांनी या निर्णयांवर आक्षेप घेतला. १ कि.मी हे अंतर किमी करावी, अशी मागणी लावून धरली. प्रशासनाने त्यानुसार १ किलो मीटर ऐवजी ५०० कि. मी. आवडे निम्मे अंतर करत बेकायदा पार्किंग पार्किंग केल्यास दाद आकारणीचा नियम केला. ७जुलै २०१९ पासून या निर्णयाची अमलबजावणी सुरु झाली. दंडात्मक कारवाईच्या धास्तीने रस्त्यावरील बेकायदा पार्किंग करून वाहतूक कोंडी करणाऱ्यांना जबर बसली. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने कमी झाली. रस्ते वाहनांची वाहतूक गतिमान झाली. मात्र, वाहन कायद्यानुसार हा दार २५ ते ५० पट आहे . त्यामुळे दंडात्मक कारवाईचे निकष बदलाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी विशेष १३ सदस्यांची समिती नेमली आहे. 

गौतम चॅटर्जी यांच्या अशक्षतेखाली १ अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त , तीन स्थायी समिती सदस्य, वाहतूक पोलीस आणि वाहतूक क्षेत्रातील दोन खासगी तज्ज्ञांचा यात समावेश केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंनाईकरांना राहत्या ठिकाणीही कमी का होईना पण पार्किंगचे पैसे भरावे लागतील. 

  • विनामूल्य पार्किंग नाहीच 

सध्या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग कमी करण्यासाठी २६ ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. साधारणतः ३००ते ४०० वाहने तेथे पार्क होतात. जगात कुठेही विनामूल्य पार्किंग नाही. सिंगापूर देशात तर पार्किंगचे दर सर्वात अधिक आकारले जातात. आता मुंबईत वाहन कायद्याच्या धर्तीवर पार्किंगचे दराचे निकष बदलण्यात येणार आहेत. मुंबईतील जागेचे दर लक्षात घेता, मुंबैकरांनाही राहत्या ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाईल. त्यासाठी माफक दर आकारले जातील, कोणालाही विनामूल्य पार्किंग करता येणार नाही. 

 

शिरीष जोशी,समिती सदस्य 

प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक सीईओ