माजी कुलगुरूंच्या काळातील घोटाळ्याची चोकशी होणार नव्याने

0
76

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.ए . चोपडे यांच्या कार्यकाळातील विविध भ्रस्टाचारांचा आरोप झालेल्या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी होणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण सचिवांची उच्च शिक्षन संचलक डॉ. धनराज माने याना आदेश दिले आहेत. यानुसार चॊकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी [२७ ] उच्च शिक्षण विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. याला विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. माने यांनीही दुजोरा दिला आहे. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. चोपडे यांच्यावर बारकोड उत्तरपत्रिकांच्या खरेदीमध्ये अनियमितता असल्याचा पहिला आरोप करण्यात आला होता. रुजू झाल्यानंतर त्यानी तातडीने दोन वेळा दीड कोटीच्या उत्तरपत्रिका खरेदी केल्या होत्या . या प्रकारणाच्या चोकशी साठी तत्कालीन अधिसभा सदस्य डॉ. सर्जेराव ठोबरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने कुलगुराना वाचवण्यासाठी ‘ नियम पायदळी तुडवले गेले: पण भ्रष्टाचार झालेला नहि ‘ असा शेरा मारून क्लीन चिट दिली होती. या प्रकरणानंतर विद्यापीठात विविध विभागामध्ये चढ्या दराने खरेदी, ओएसडी भरती प्रकरण,परीक्षा भिभागाचा ३ कोटी रुपयांपेक्षा अधीकच निधी स्वतःच्या खात्यात वळती करणे.

स्वतःच्या स्वाक्षरीने धनादेश देणे अशा विविध प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. याशिवाय विद्यापीठाच्या अधिसभा , व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीतही नियमबाहयपणे नेमणूक केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाला विधान परिषदेत आ. सतीश चव्हाण यांनी वाचा फोडली होती, तेव्हाचे तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यपालाच्या मान्यतेनुसार कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या कार्यकाळातील सर्वच आरोपांची चौकशी करण्यासाठी माझी कुलगुरू डॉ. एस . एफ, पाटील. यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदसीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीने चार महिने सर्व आरोपांची चोकशी करीत राज्य शासनाला अहवाल सादर केला.  या अहवालामध्ये कुलगुरू डॉ. चोपडे यांच्यावर असलेल्या भ्रस्टाचाराच्या आरोपांना पुष्टी देणार आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शासनाने कारवाई करण्यापूर्वी डॉ. एस . एफ. पाटील समितीच्या चॊकशीतील तथ्याची पडताळणी करण्याचे उच्च शिक्षक संचालक डॉ. धनराज माने याना आदेश दिले आहेत.

कागदपत्रांची होणार पडताळणी राज्यशानाकडे डॉ. पाटील समितीने सादर केलेल्या अहवाल राज्यपालकडे पाठविण्यात आला आहे/ त्यात डॉ. चोपडे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहे. तसेच हा अहवाल गोपनीय ठेंव्यात आला आहे. शासन पुन्हा एकदा आरोपाची शहानिशा करणार आहे. याविषयी उच्च शिक्षक माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले , राज्य शासनाने तत्कालीन कुलगुरुंवर झालेल्या आरोपाची पडताळणी करण्याचे पत्र मला मिळाले, त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून घोटाळ्यांचा आरोप असलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे सुचवले आहे. कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली होईल. डॉ. पाटील समितीच्या अहवालाची सत्यता पडताळणे हाच शासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here