साधी धमकी देण्याची लायकी नाही, मग आदित्यांना झेड सुरक्षा कशाला; निलेश राणे

0
75
Nilesh_Rane

साधी धमकी देण्याची लायकी नाही, मग आदित्यांना झेड सुरक्षा कशाला; निलेश राणे 

मुंबई  : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील अनेक व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत बदल करण्यात आले . शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली  . त्यानं झेड दर्जाची सुरक्षा देणार आली . यावरून भाजपचे नेते निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. 

आदित्य ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एकही केस नाही. आतापर्यन्त त्यांनी कुणी धमकीही दिली नसून कुणाल धमकी देण्याची त्यांची लायकी नाही. असे असताना त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची काय गरज ? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला. 

तर आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा देणे म्हणजे , हा उघडउघड्पणे सत्तेचा दुरुपयोग असून हा दुरुपयोग महाराष्टाच्या जनतेला पटणारा नाही. त्यामुळे ठाकरे लवकरच तोंडावर आपटणार असल्याची टीका सुद्धा राणेंनी यावेळी केली. 

महाराष्ट्रात ९७ व्हीआयपीना सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येते. यापैकी २९ व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर , उत्तर प्रदेशचे माजी मंत्री राज्यपाल राम नाईक, वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम, यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.