निलेश राणेंची जीभ घसरली, शिवसेना खासदारांवर आक्षेपार्ह टीका

0
69
nilesh rane

निलेश राणेंची जीभ घसरली, शिवसेना खासदारांवर आक्षेपार्ह टीका 

मुंबई :  भाजप नेते खासदार नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. शिवसेना आणि राणे कुटुंब एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पण नारायण राणे यांचे पुत्र आणि माझी खासदार निलेश राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. निलेश राणेंनी ट्विटरवर विनायक राऊतांच्या फोटो शेअर करत आक्षेपार्ह टीका केली आहे. 

निलेश राणी यांनी ट्विट केलेल्या या फोटो मध्ये काही लोक शिवसेना खासदार विनायक राऊत याना पकडायचं दिसून येत. यामध्ये निलेश राणेंनी कॅप्शन देत म्हटलंय कि, आज दुपारी कुडाळच्या जगंलात काही लोकांनी डुक्कर पकडला. निलेश राणे यांनी राजकीय टीका करताना अनेकदा समोरील नेत्यांबाबत आरे-तुरे या भाषेचा प्रयोग करताना पाहायला मिळाले आहे. 

काही दिवसापूर्वी निलेश राणेंनी शिवसेनेला खोचक टोला लगावला होता. शिवसेना आमदारांनी हॉटेल रिट्रीटमध्ये ५ दिवस राहून मोठं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं. मात्र काँग्रेस बोलावेल तेव्हा गुपचूप परत यायचं. कारण मातोश्री आता १० जनपथ दिल्लीला शिफ्ट झाली असून परत येताना भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून यायचे असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला होता. 

दरम्यान , रविवारी सिंधुदुर्गात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी सरकारवर टीका केली होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना , राष्ट्रवादी, काँग्रेस, महाविकास आघाडीचे सरकार हे पाहुणे सरकार आहे. ते फार काळ टिकणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला होता. हे सरकार स्थगिती सरकार आहे, असेही राणे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फारकाळ टिकणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि  राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ स्वार्थापोटी एकत्र येत हे सरकार स्थापन केले आहे. यावेळी गेल्या काही दिवसात सरकारने विविध विकासकामांना दिलेल्या स्थगिती वरूनही नारायण राणे यांनी सरकारवर ठीक केली होती.