नवीन मंत्र्याची शपथविधी होणार विधानभवनात

0
91
vidhanbha

राज्य मंत्रिमडळाचा रखडलेला विस्तार ३० डिसेंबरला करण्याचे निश्चित झाले आहे. जलसंपदा घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार याचा मंत्रिमंडळात समावेश पक्का झाला आहे. त्यांच्याच गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडणार आहे. काँग्रेसच्या दिग्गज आमदारांनी मंत्रिपदासाठी दिल्लीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

मंत्रिमंडळाचा विस्तार ३० तारखेला दुपारी १ वाजता विधानभवनाच्या प्रागंणात केला जाणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १० कॅबिनेट तर ३ राज्यमंत्री शपथ घेतील. 

शिवाजी पार्कवर मोजक्याच नेत्यांना शपथ देण्यात आली होती मात्र, ३० तारखेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ३६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.  यावेळी त्यांचे कुटुंबीय , समर्थक आणि कार्यकर्ते, याना हा सोहळा पाहता यावा म्हणून या सोहळ्याची तयारी करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कवरील शपथविधीवर झालेल्या खर्चावर टीका झाल्याने आता हा शपथविधी विधान भवनात घेतला जाणार आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी देखील तयार झाली आहे. काँग्रेस मध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नेते आणि आमदार दिल्लीत लॉबिंग करत आहेत. जास्तीत तरुण आमदार व नवीन चेहऱ्यानं साधी मिळावी असा  काँग्रेस आमदारच आग्रह आहे.  

मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हेदेखील मंत्रिमंडळात समावेशा साठी प्रयत्नशील आहेत. अशोक चव्हाण यांचा समावेश पक्का असला तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या समावेशा बाबत काळ सुरू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार यांचा समावेश निश्चित झाला आहे . अजित पवार यांनी बंडखोर करीत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे त्याच्या बाबत शरद पवार कोणता निर्णय घेतात याबाबत उत्सुकता होती. उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील नावाचीही चर्चा आहे. शिवाय राष्ट्रवादी कडून हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील,जितेंद्र आव्ह्ड, राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिगणे, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांचा समावेश निश्चित आहे. 

काँगेसमधून विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, वर्ष गायकवाड सतेज पाटील,सुनील केदार, अमित देशमुख,यशोमती ठाकूर यांचा समावेश केला जाणार असल्याचे समजते. मुंबईतून अस्लम शेख किंवा अमीन पटेल यांच्या पैकी एकाची वर्णी लागू शकते. तर सांगलीतून विश्वीजित कदम यांचाही समावेश शक्य आहे. प्रणिती शिंदे याची वर्णी लागावी म्हणून त्यांचे पिता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.