India vs West Indies : एकदिवसीय मालिकेत बसू शकतो भारताला मोठा धक्का

0
137
india

India vs West Indies : एकदिवसीय मालिकेत बसू शकतो भारताला मोठा धक्का. 

मुंबई :  भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी -२० मालिका सध्या रंगतदार अवस्थेत आहे. दोन्ही संघानी प्रत्येकी एक -एक सामना झिकला आहे. या एकदिवसीय मालिकेत भारताला मोठा धक्का बसू शकतो असे म्हण्टले जात आहे. 

ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी भाताला काही धक्के बसले होते. या मालिकेपूर्वी सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या जागी संघात सजू सॅमसन ला संधी देण्यात आली होती. पण आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये संजूला एकही संधी देण्यात आलेली नाही. 

धवनला भारतातीलसय्यद मुश्ताक अली ट्वेंटी – २० स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. एका फटका मारताना चेंडू धवनच्या डाव्या गुडघ्यावर लागला होता. त्यामुळे धवनला मोठी दुखापत झाली होती. आणि त्याने ट्वेंटी- २० मालिकेतून माघार घेतली होती. 

आता काही दिवसांमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. त्यासाठी भारताचा संघही काही दिवसांमध्ये आपल्या समोर येणार आहे. धवनला झालेली दुखापत अजूनही पूर्णपणे बारी झालेली नाही. त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेत खेळणार कि नाही, याबद्दल संदिग्धता निर्माण झालेली आहे. पण फिट झाल्यावरही त्याला चाचणी द्यावी लागणार असून हि गोस्ट किती लवकर करता येईल, याबद्दलही संभ्रम आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला धवन एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही, अशी चर्चा सुरु झाली . 

पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेल २०८ धावांचा लक्ष्य टीम इंडियाने ६ विकेट्स व ८ चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी नंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद ९४ धाव चोपून भारताला विजय मिळून दिला . वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०७ धावा केली. एव्हीन लुईस १७ चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचून ४० धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेडन किंग [३१ ] , शिमरोन हेटमायर [ ५६ ] , आणि किरॉन पोलार्ड [ ३७ ] यांनी फटकेबाजी केली. फेसन होल्डरनंही ९ चेडूंत २४ धावा चोपल्या .युजवेंद्र चहल एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला. पण दुसऱ्या सामन्यात मात्र भारताला पराभव पत्करावा लागला होता.