“सर्व राज्यांनी औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालावी

0
82
Buying Medicine Online

“सर्व राज्यांनी औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालावी…… “

नवी दिल्ली [ वृत्तसंस्था ] : औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी आणण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करा, असा आदेश भारतीय औषध नियंत्रकांनी सर्व राज्यांना दिला आहे. ‘ रायटर्स ‘ या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार सेंट्रल ड्रग्स स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचे [ सीएससीओ ] जेष्ठ अधिकारी के. बंगारूराजन यांनी हि माहिती दिली. आता राज्य सरकारला यावर काय कार्यवाही करणार, याकडे लक्ष लागले आहे. 

भारताने आतापर्यंत औषधांची ऑनलाईन विक्री आणि ई -फार्मसीशी संबंधित कायद्याला अंतिम रूप दिलेले नाही. गेल्या काही वर्षात मेडलाईफ , नेटमंड्स, टेमसेक फंडेड फार्मायझी आणि सिको आदी ऑनलाईन कंपन्यांनी या व्यवसायात चांगलाच दम बसवला असून त्यामुळे पारंपरिक औषधांची दुकाने यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. दिल्ली हायकोर्टने डिसेंबर मध्ये सरकारी औषधाची ऑनलाईन विक्रीवर तत्काळ बंदी घालावी असा आदेश एका डॉक्टरांनी केलेल्या याचिकेनंतर दिला होता. 

के. बंगारूराजन यांनी सांगितले कि, संस्थेने अगोदरच राज्य सरकारांना कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले होते. आता सर्व अधिकाऱ्यांना रिमायंडर पाठवण्यात येत आहे. ते म्हणाले कि, राज्य औषध नियंत्रक नियामक प्राधिकारण आहे. तर अशा कंपनीवर कारवाई केली पाहिजे . सर्वच राज्यांना सीडीएससीओकडून २८ नोव्हेबंरला मार्गदर्शक तत्वे पाठवण्यात आली होती.