सेवाशुल्काच्या स्थगितीने उद्योग क्षेत्राला दिलासा

0
85
maharashtra-kolhapur-150034412831-orijgp

सेवाशुल्काच्या स्थगितीने उद्योग क्षेत्राला दिलासा 

कोल्हापूर : औद्योगिक वसाहतीमधील [ एमआयडीसी ] भूखंडाच्या सेवाशुक्लच्या वाढीला राज्य शासनाने स्थागिती दिल्याने कोल्हापुरातील उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. मंदीचा सामना करणाऱ्या येथील तीन मोठ्या औद्योगिक वसाहतीमधील १५०० उद्योजकांना काहीसा आधार मिळाला आहे. या शुल्कामध्ये होणारी वाढ कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी संघटना शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. क्षेत्रामध्ये दिवाबत्ती, रस्ते, पाणीपुरवठा वितरण, सांडपाणी व्यवस्था आणि अनुषंगिक सेवांचा समावेश होता. या सेवा पुरविण्यासाठी महामंडळाला जो खर्च करावा लागतो, त्याची प्रतिपूर्ती होण्यासाठी कमी दराने भूखंड धारकांना सेवा शुल्क आकारण्याचे अधिकार या महामंडळाना दिले आहेत. सेवा- सुविधांवरील खर्चात गेल्या १० वर्षात झालेली वाढ विचारात घेऊन महामंडळाने सेवाशुल्काच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपालाच्या आदेशाने या निर्णयाचे परिपत्रक महामंडळाकडून नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध केले. या सेवाशुल्काचे दर पाचपट वाढल्याने कोल्हापूर जिल्हा तील उद्योगकामधून नाराजी व्यक्त  झाली . 

औद्योगिक क्षेत्रात मंदीची स्थिती असल्याने शासनाने सेवा शुक्ल मध्ये वाढ करू नये, अशी मागणी उद्योजकांनी केली.  यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यावर उद्योगमंत्री सुभाष देसाईं यांनी सेवाशुक्लच्या वाढीच्या ११ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशाला स्थगिती दिली आहे : यामुळे गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल- हातकणंगले या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील १५०० उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. 

तसेच सुविधांवरील खर्चात झालेली वाढ विचारत घेऊन महामंडळाने सेवाशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. 

सेवाशुल्कचे दर पाच पटीने वाढल्याने जिल्ह्यातील उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. मंदीच्या काळात हा अतिरिक्त बोजा नको असल्याची भावना. 

उद्योजकांनी पाठपुरावा केल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई, सेवाशुल्काच्या वाढीच्या आदेशाला स्थगिती दिली यामुळे जिल्हातील उद्योजकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.