पेट्रोलपंपावर लवकरच मिळणार मिथेनॉल मिश्रित इंधन

0
96

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या वाढत जाणाऱ्या किमती आणि ते खरेदी करण्यासाठी द्यावे लागणारे परदेशी चलन , यावर पर्याय म्हणून देशभरात लवकरच मिथेनॉल मिश्रित उपलब्ध इंधन उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी देशभरातील पेट्रोलपंपावर मिथेनॉल उपलब्ध करून द्यावे , अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. याबाबत त्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. 

इंधनामध्ये १५ % मिथेनॉल मिसळल्यास इंधन आयातीवरील खर्चात काही प्रमाणात कपात होतील यामुळे दरवर्षी सुमारे ५,००० कोटीरूपयांची बचत होईल. तसेच मुख्य म्हणजे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणातही घट होईल असे सांगितले जात आहे. 

सरकार देशान्तर्गत मिथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन देणार आहे. यामुळे २०३० पर्यंत भारताच्या कच्चा तेलाच्या आयातीच्या खर्चात ३० टक्के बचत होईल, असा दावा नितीन गडकरी यांनी आधी केला होता. 

जगामध्ये भारत हा क्रूड ऑईल आयात करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. भारताने प्रतिवर्षी २९०० कोटी लिटर पेट्रोल आणि ९००० कोटी लिटर डिझेलचा वापर होतो. या इंधनासाठी पाच लाख कोटी रुपयांचे परकीय चलन खर्ची पडते. या खर्चामध्ये कपात करण्यासाठी केंद्र शासनाने पेट्रोल मध्ये १० % इथेनॉल मिश्रणाचा महत्वकांशी कार्यक्रम जाहीर केला. हे सगळं असलं तरी इथेनॉल उत्पादनाला असलेल्या मर्यादा आणि इथेनॉल उत्पादन खर्च यामुळे हे उद्दिष्ट्य साध्य होताना अनेक अडथळे निर्माण होणार. या पार्श्वभूमीवर १५ % इथेनॉल मिश्रण करण्याचा प्रस्ताव आहे.