पीएनबी घोटाळा प्रकरण: नीरव मोदी फरार घोषित

0
101
मुंबई: 
पंजाब नॅशनल बँक { पीएनबी } घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंड्रीग ऍक्ट [ पीएमएलए ] न्यायालयाने अखेर गुरुवारी ‘ फरार आर्थिक गुन्हेगार ‘ म्हणून घोषित केले.त्यामुळे सक्तवसुली संचलनालयाचा [ ईडी ]नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फरार आर्थिक गुन्हेगार कायदा. ‘ ऑगस्ट २०१८ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्याअंर्गत फरार घोषित केला जाणारा नीरव हा दुसरा सर्वात मोठा उद्योगपती आहे. याआधी विजय मल्ल्याला या कायद्याअंतर्गत फरार घोषित केले होते. 
विशेष पीएमएलए न्यायायालयाचे न्या . व्ही . सी. बर्डे यांनी ईडी व मोदीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मोदीला फरार  जाहीर केले. फरार आर्थिक गुन्हेगार कायदा ‘ अंतर्गत १०० कोटीहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार केलेल्या व्यक्तीला वारंवार वारंट बजावूनही तो न्यायालयात उपस्थित राहत नसेल व तो देश सोडून फरार झाला असेल आणि देशात परत येण्यास नकार देत असेल रे त्या व्यक्तीला कायद्यानुसार ‘ फरार आर्थिक गुन्हेगार ‘ म्हणून जाहीर केले जाऊ शकते. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते कि, फोजदारी कारवाई होऊ शकते , असा संशय आल्याने ती कारवाई टाळण्यासाठी त्याने देश सोडला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवणे. 
न्यायालयाने मोदीला फरार जाहीर केल्यानंतर ईडीचा त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
ईडीने मोदींची आत्तापर्यंत १,३९६,०७ कोटीची संपत्ती जप्त केली आहे. पीएनबी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी हे आहेत. हा घोटाळा जानेवारी २०१८ मध्ये उजेडात आला . मात्र, तत्पूर्वी हे दोघेही देश सोडून फरार झाले. नीरव मोदीला मार्च २०१९ मध्ये लंडनमध्ये अटक झाली . त्याच्या प्रत्यप्राणाची प्रक्रिया प्रलंबित आहे
मोदीला फरार म्हणून जाहीर करावे, यासाठी ईडीने जुलै २०१८ मध्ये विशेष न्यायालयात अर्ज केला. त्यावर मोदींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पीएमएलए अंतर्गत नोंदविलेल्या जबाबांचा आधार घेऊन ईडी ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा ‘ अंतर्गत कारवाई करीत आहे. आणि कायद्याने हे अयोग्य आहे. 
१५ जानेवारीपर्यंत कोर्टात हजर राहण्याचा आदेश 
ईडीच्या म्हणण्या नुसार , मोदी आणि चोक्सी यांनी पीएनबीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्याशी हातमिळवणी करून बँकेला १४ हजार कोटी रुपयांना बुडविले . विशेष पीएनएमए न्यायालयासोबत विशेष सीबीआय न्यायालयानेही मोदीभोवतीचे फास आवळले आहेत. बुधवारी न्यायालयाने मोदी व त्याच्या दोन साथीदारांना १५ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here