प्रशांत किशोर यांनी मानले राहुल गांधींचे आभार

0
84

नवी दिल्ली:  काँग्रेसच्या पहिल्या फाळणीतील नेत्यांनी सोमवारी देशातील एकतेसाठी राजधानी दिल्लीत सत्याग्रह आंदोलन केलेलं. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. 

देशाच्या संविधानावर मोदी सरकारला हल्ला करून देणार नाही. , असं राहुल गांधी यांनी खडसावून सांगितलं होते. राहुल गांधी यांनी NRC वरून घेतलेल्या भूमिके नंतर जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी राहूल गांधींचे कौतुक करत आभार मानले. 

एनआरसी कायद्या विरोधात सत्याग्रह आंदोलनात सामील तुम्ही झालात. नागरिकांत संशोधन कायदा तुम्ही काँग्रेसशासित राज्यात लागू होऊ देणार नाही यावर आम्हाला विश्वास असल्याचे प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी ना उद्देशून म्हटले. या कायद्या विरोधात जनआंदोलनाची गरज आहेच. आणि या व्यतिरिक्त आपल्याला अशा राज्य सरकारची गरज आहे, जिथे हा कायदा लागू होणार नाही. आता आशा आहे कि, तुम्ही काँग्रेसशासित राज्यात कायदा लागू होऊ देणार नाहीत. असंही प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राज घाटावर सोमवारी सत्याग्रह आंदोलन पार पडले. देशाला नष्ट करण्याचं काम शत्रू करू शकले नाहीत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम चांगल्या पद्धतीने करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी येथे केला होता. तुम्ही भारत मातेचा आवाज दाबू शकणार नाहीत, असं हल्लाबोल राहुल यांनी या वेळी केला .