राज ठाकरे ‘ भगव्या ‘ खेळीच्या तयारीत

0
85
Raj-Thackeray

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसात हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी २३ जानेवारी रोजी पक्षाचे पहिले महाअधिवेशन आयोजित केले असून ‘ येथून नव्या स्वरूपातील राज ठाकरे तुम्हाला दिसेल, अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना नव्या राजकीय भूमिकेचे संकेत अलीकडेच दिले आहेत. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्याने दुखावलेले शिवसेनेचे कट्टर हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे खेचण्याची व येत्या महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढवायची , अशी त्याची रणनीती आहे. 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक अलीकडेच पुण्यात झाली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे याना ‘ आपला शत्रू कोण ‘ असा सवाल केला . एकेकाळी आपण भाजप व आणि नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. तर लोकसभा निवडणुकीत आपण भाजप व मोदींना विरोध केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण घेतलेल्या भाजप विरोधी भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस लक् लाभ झाला. पण   त्यानंतर राष्ट्रवादीने सेनेसोबत सत्ता स्थापन केली तर मनसेला काहीच फायदा झाला नाही . आगामी महापालिका निवडणुकीत आपला शत्रू कोण ते जाहीर करा, अशी आग्रही मागणी पदधिकाऱ्यानी केली. शिवसेनेच्या सत्तेमुळे त्याचा हिंदुत्ववादी मतदार अस्वस्थ असल्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर राज यानी वरील घोषणा केली. 

  • शक्तिप्रदर्शनाची तयारी 

मनसेने आपल्या १३ वर्षाच्या वाटचालीमध्ये एकही महाअधिवेशन आयोजित केलेलं नाही. गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर होणाऱ्या या महाधिवहनानिमित्याने मनसे मोठ्या शक्तिप्रदर्शनच्या तयारीत आहे. मनसे ह्यावेळी कोणती  भूमिका घेते, याकडे सत्ताधारी शिवसेनेबरोबरच विरोधी पक्ष भाजपचे हि लक्ष लागले आहे. 

  • शिवसमरकाला विरोध नको: पदाधिकाऱ्यांची भूमिका 

राज ठाकरे यांनी शिवस्मारकाला केलेल्या विरोधाबाबत बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या आया भूमिकेमुळे मूठभर पर्यावरणवादी खूष होत असले तरी ग्रामीण भागातील खूप मराठा समाजातील कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी नाराज होतात. त्यामुळे काही संवेदनशील विषयांवर तुम्हाला असत्य बोलणे शक्य होत नसले तरी चालेल पण सत्य बोलू नका, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली .