श्वास रंकाळा … ध्यास रंकाळा, रंकाळा आमचा मान … कोल्हारची शान

0
94
rankala-kolhapur

कोल्हापूर : 

श्वास रंकाळा …… ध्यास रंकाळा, रंकाळा आमचा मान…. कोल्हारची शान , स्वच्छ रंकाळा…. सुंदर रंकाळा… अशा घोषणा देत रंकाळा संवर्धन जनजागृती साठी शहरवासीयांनी बुधवारी सकाळी परिक्रमा काढली . रंकाळा दिवसा निमित्य रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीच्या वतीने परिक्रमा आयोजित केली होती. नवनाथ मंदिरापासून सकाळी पावणे सात वाजता सुरु झाली. चौपाटी, रंकाळा टॉवर , संध्यामठ ,इराणी खणमार्गे पदपथ उद्यानामध्ये समारोप झाला . 

यावेळी महापालीका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रंकाळा संवर्धन समितीने रंकाळा संवर्धनासाठी उभी केलेली लोकचळवळ महत्वाची आहे. प्रदूषण मुक्त रंकाळ्यासाठी जाणीव व जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक हटाव मोहिमेद्वारे स्वच्छ  आणि सुंदर रंकाळ्याचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन केले. 

यावेळी नगरसेवक अजित राऊत म्हणाले, रंकाळाप्रेमी लोकांमुळेच ऐतिहासिक रंकाळचे अस्तित्व टिकून आहे. रंकाळा स्वच्छतेसाठी ‘ एक दिवस रंकाळ्याची ‘ मोहीम पुन्हा पुन्हा सुरु करावी . रंकाळा समितीचे राजेंद्र पाटील यांनी रंकाळा संवर्धनाची शपथ येऊन रंकाळा परिक्रमा मार्ग काढावा तसेच रंकाळ्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी रंकाळ्याच्या कायमस्वरूपी ठोस विकास आराखडा राबवण्याची मागणी केली.

परिक्रमेचे नियोजन अभिजित चौगले, विजय सावंत, इंद्रजित साळोखे, संजय मांगलेकर , सुधीर राऊत, यशवंत पाटील, यांनी केले. रंकाळा समितीचे विकास जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. पी चौगले यानी  आभार मानले. परिक्रमेत नगरसेवक शेखर कुसाळे, महापालिकेचे करनिर्धारक संजय सरनाईक, राजशेखर तंबाके , चंद्रकांत वडगावकर, प्रशांत गडकरी, भरत गांधी, किसन चव्हाण, सुभाष हराळे ,सुनील हराळे राजेश कोगनूळकर. संदीप मगदूम, दीपक जगदाळे, ऋषिकेश जाधव, नितीन गुंजूटे , बी. एम . चौगले, आदी सहभागी झाले होते.