India vs West Indies : रवी शास्त्रीनीं मैदानात ‘ या ‘ खेळाडूचे केले लाड: पण संघात नाही दिल स्थान

0
66
ravis

India vs West Indies : रवी शास्त्रीनीं मैदानात ‘ या ‘ खेळाडूचे केले लाड: पण संघात नाही दिल स्थान 

भारतीय संघात नेमके कधी आणि काय बदल होतील, हे सांगता येत नाही.  कारण सराव करताना चित्र आणि संघात निवड यामध्ये बराच फरक असल्याचे पाहायला मिळते. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर एका खेळाडूचे मैदानात भरपूर लाड केल्याचे पाहायला मिळाले, पण त्याला संघात मात्र स्थान दिले नाही. 

भारतीय संघ व्यवस्थापनात रिषभ पंतला भरपूर संधी देत आहे. तो चांगल्या फॉर्म मध्ये नसला तरी त्याला स्थान दिले जाते पण दुसरीकडे युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला मात्र अजून एकही सामना खेळवला नाही. संजूला तर एकही सामना न खेळवत गेल्यावेळी संघातून बाहेर काढण्यात आले होते. पण सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे संजूला यावेळी संघात स्थान मिळाले. पण अजूनही त्याला संधी मिळालेली नाही. 

भारतविरुद्धवेस्टइंडिजयांच्यातीलदुसरासामनारविवारीतिरुअनंतपुरमयेथेखेळवण्यातआलाहोता.संजूइथल्यास्थानिकखेळाडूआहे.यामुळे या सामन्यातरी संजूला स्थान मिळेल असे वाटले होते. पण संजूला या सामन्यातही स्थान देण्यात आले नाही. पण मैदानात मात्र शास्त्री संजूचे चांगलेच लाड करत असल्याचे समोर आले. आता नेमके घडले तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल …..  

संजू केरळच्या स्थानिक खेळाडू त्यामुळे तो जेव्हा सरावासाठी मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी त्याच्या नावाने पुकारा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी रवी शास्त्री हि त्याच्या जवळ होते. सुरुवातीला त्यांनी मस्करी मध्ये त्याला फाईट मारण्याची अक्टिंग केली. त्यानंतर त्याला मिठी मारत त्याचे केल्याचे पाहायला मिळाले. 

विराट कोहलीने त्या सुपर कॅचबद्दल केला मोठा खुलासा. 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेन्टी -२० सामन्यात विराट कोहलीनं “सुपरकॅच” घेतल्याने पाहायला मिळाले . कोहलीने वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमार चा अफलातून झेल घेतला आणि साऱ्यांनाच धक्का बसला. कारण झेल कोणी पकडेल असे, वाटले नव्हते पण कोहलीने हा झेल पकडला. या झेलनंतर सर्वांनीच कोहलीचे कौतुक केले. पण या झेलबाबत कोहलीने मोठा खुलासा केला आहे. 

शिमरोन हेटमायरने दुसऱ्या ट्वेन्टी -२० सामन्यात चांगलीच फटकेबाजी केली.  त्यानं रवींद्र जडेजाला एका शतकात सलग दोन षटकार खेचले, परंतु तिसरा षटकार खेचण्याचा नादात तो झेल देऊन माघारी परतला. भारताला हा सामना गमवावा लागला. 

सामना संपल्यावर कोहल्ला झेलबाबत विचारण्यात आले. तेव्हा कोहली म्हणाल कि. “ जेव्हा चेंडू हातामध्ये फसतो तेव्हा असे झेल घेतले जातात . मी चेंडूला बघत होता. जेव्हा चेंडू जवळ आला तेव्हा मी हात पुढे केले. मात्र, नशीब बलवत्तर होत, त्यामुळे मला हा झेल पकडता आला. “ 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी -२० सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेबाजार जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. शिवम दुबेनं पाहिलं आंतरराष्टीय ट्वेंटी -२० क्रिकेटमधील अर्ध शतक झळकावताना आजचा दिवस गाजवला आणि त्यामुळे भारताला समाधानकारक पल्ला गाठता आला आला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजानी खेळपट्टीचा योग्य अंदाज बांधताना भारताच्या धावगतीवर वेसण घातले. विंडीजच्या केसरीक विलियम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताने २० षटकात ७ बाद १७० धावांपर्यंत मजल मारली. शिवम ३० चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धाव चोपल्या .

लेंडल सिमन्स आणि एव्हीन लुइस यांनी संयमी खेळ केला.  त्यांना नशिबाचीही साथ लाभली. पाचव्या षटकात सिमन्सचा झेल वाशिंग्टन सुंदरन सोडला. भुवनेश्वर कुमारच्या त्याच षटकात लुईसचा झेल रिषभ पंथ कडून सुटला. हा झेल थोडासा अवघड होता, परंतु रिषभ पुरेपूर प्रयन्त केले. विंडीजन पहिल्या पॉवर प्लयेमध्ये एकही विकेट न गमावता ४१ धाव केल्या. त्यानंतर दोघांनी फटकेबाजी केली. वॉशींग्टन सुंदरच्या अखेरच्या षटकात भारताला यश मिळालं. १० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिषभ पंथन विडीजच्या लुईसला यष्टीचित केले. लुईस ३५ लुईस ३५ चेंडूत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४० धावांत तंबूत परतला.