मुंबई : जळगावत आज, भाजपची विभागावर आढावा बैठक सुरु

0
71
appeal-to-bjp-conference

मुंबई : जळगावत आज, भाजपची विभागावर आढावा बैठक सुरु आहे. पण , एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेतेच बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.  भाजपमध्ये नेत्यांचा एक गट नाराज आहे. त्याचं नेतृत्व एकनाथ खडसे करत असल्याचं बोललं जातंय.

एकनाथ खडसे आहेत कुठे. ? 

भाजप सध्या राज्यात विभागावर आढावा बैठका घेत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मतदार संघातील कारणांचा राजकीय समीकरणाचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या आढावा बैठका सुरु आहेत. उत्तर महाराष्ट्राची धुरा असलेले गिरीश महाजन तसेच राधाकृष्ण विखे-पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. पण एकनाथ खडसेंच जळगावच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं विखे-पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते, पण एकनाथ खडसे जळगावच्या बैठकीला हजार नव्हते. भाजपच्या गोटात नाराजीची चर्चा पुन्हा सुरु झाली . एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीबद्दल भाजपमधून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच एकनाथ खडसे यांच्या बाजुनेही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण एकनाथ खडसे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे

  • नाराजी कशामुळे ? 

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवणुकीत पराभव झाला. तत्पूर्वी एकनाथ खडसे याना तिकीट नाकारण्यात आलं. शेवटच्या टप्यात रोहिणी खडसेंना तिकीट देण्यात आलं. पण, निवडणुकीत रोहीने खडसे यांचा पराभव झाला. या पराभवाला भाजपमधील अंतर्गत राजकारण जबाबदार असल्याची टीका केली होती. खडसे यांच्यासह पंकजा मुंडेहि नाराज असल्याची चर्चा होती. पण त्यांनी मीडियाशी बोलताना अशी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं होत. भाजपने विधानसभेत तिकीट नाकारलेले विनोद तावडे, रॅम शिंदे गे नेतेही पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. दोन दिवसापूर्वी खडसे आणि पंकजा मुंडेंची भेट झाली होती. त्यामुळे हि नाराजी अधोरिखित झाल्याचं बोललं जात आहे  .