पूर नुकसान भरपाईसाठी ऋतुराज पाटलांची नागपूर विधानसभेमध्ये फटकेबाजी

0
141
ruturaj patil

नागपूर विधान-सभेमध्ये पहिल्यांदाच बोलताना युवा नेते ऋतुराज पाटील यांनी म्हणले “सन्मानिय अध्यक्ष महोदय पुरवणीमागणीच्या अनुषंगाने  मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६६ व ६७ मधील काही गोष्टी मांडतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रा मध्ये पुरामुळे आणि पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानी साठी सामोरे जावे लागले आहे. यामध्ये घराचे असो किंवा कारागीर आणि व्यापारी तसेच शेतकऱ्याच्या पिकाचे  असतील यांचे नुकसान झाले आहे. मी आपल्याला विनंती करतो कि, ज्याप्रमाणे नुकसान झाले आहे त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यासाठी आदेश द्यावे .”“त्याचप्रमाणे शासकीय मालमतेचा देखील नुकसान झाले आहे. अध्यक्ष महोदय वरनमूद केलेल्या बाबी तसेच प्रभाग क्रमांक ६६ ६७ अनुषंगाने  शासकीय इमारती , तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी निधी तरदूसाठी मागणी केली आहे. यानिमित्याने ग्रामीण रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे इमारतीची वस्तूस्थती आपल्यासमोर मांडत आहे. आज या ठिकाणी जिल्ह्यातील ३४१ आरोग्यकेंद्राची इमारतीची पडझड झाली आहे.आणि त्या ठिकाणी  ग्रामीण भागातून पेशन्ट येतात , तसेच त्यांना चांगल्या ठिकाणी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होता नाही . याची त्यांना अडचण होता आहे .ह्या इमारतीची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचं आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ कोटी ७१ लाखाचा प्रस्ताव दिला आहे, पण तो अजून प्राप्त झालेला नाही . तर तो निधी उपलब्ध व्हावा, याबरोबरच याच खात्याशी संबधित प्रभाग क्रमांक ६५ मध्ये महसूल विभागातंर्गत शासकीय कार्यालय इमारती साठी जवळजवळ  ६ कोटी २५ लाखाची तरतूद केली आहे. पूर आणि पावसा मुळे कोल्हापूर जिल्हा तील अनेक शासकीय इमारतिचे, जिल्हा परिषद , तालुका पंचायत , ग्रामपंचात ह्यांच्या ४२७ इमारती व मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांच्या .दुरुस्तीसाठी १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी दिला पण तो अजून प्राप्त झाला नाही. जिल्हा तील अनेक अंगणवाडी इमारतीचे नुकसान झाले आहे. त्या अंगणवाडी इमारती दुरुस्ती साठी १९ कोटी ७ लाख रुपयाची मागणी केली आहे. याची  देखील तरतूद केली आहे. त्याबरोबरच शहर आणि ग्रामीण भागातील ८०४ पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. यासाठी ६३ कोटी २३ लाख रुपयांचा निधी प्रस्ताव सादर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुरामुळे व पावसामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे .१३८ कोटींचा निधी मंजूर करावा यासाठी प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी आपण लक्ष द्यावे अशी विनंती करतो . शासनाकडून हा निधी लवकरात लवकर मिळावा अशी विनंती करतो.अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा आम्हाला बोलायला संधी दिल्या बद्दल आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र्र.” असेही ते म्हणाले.कोल्हापूर  विधानसभा मतदारसंघात अगदीच एकतर्फी झालेल्या निवडणुकीत ऋतुराज पाटील जिंकून आले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत स्थापन केलेली महाराष्ट्र विकास आघाडी या सर्व राजकीय घडामोडींमध्ये  ऋतुराज पाटील यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे नागपूर विधानसभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.