सावला टोळीतील दहा मटकाबुकी येरवड्याला

0
98

कोल्हापूर : महाराष्ट्र , कर्नाटक, राज्यस्थान , गुजरातसह आठ राज्यात मुंबई मटका उलाढालीचा सूत्रधार मटकाकिंग वीरेन सावला व त्याच्या चुलत्यासह टोळीतील साथीदारांना येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. दरम्यान, कळंबा कारागृहातील या आरोपीची बडदास्त प्रकरणी तीन अधिकार्यांसह १५ सुरक्षारक्षकांची चौकशी अंतिम टप्यात आहे. 

मटकाकिंग सावला , मटकाबुक्की सलीम मुल्ला, सम्राट कोरणे, इचलकंरजीतील राकेश अग्रवाल , सांगलीतील झाकीर मिरजकर टोळीतील ४४ जणांवर मोक्का , अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुख्य सुत्रधार प्रकाश उर्फ पप्पू सावला , कोराणे वगळता ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघांच्या शोधा साठी कोल्हापूर पोलीस दलाची सहा पथके महाराष्ट्रासह अन्य राज्यात दोन महिन्यापासून कार्यरत आहेत. 

सावला ,मुल्ला, अग्रवाल टोळीतील साथीदार कळंबा कारागृहात बंदिस्त आहेत. टोळी तील साथीदारांवर कळंबा कारागृहाची प्रशासनाची मेहनजर असल्याची चर्चा होती. नातेवाईकांशी वारंवार चर्चा ,वरिष्ठांच्या कार्यालयात कुटूंबियांची भेट घडविणे, खाद्यपदार्थ पुरविणे, वेगवेगळ्या नावावर एकाच व्यक्तीची भेट घालून देणे असे एक ना अनेक संशयास्पद प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. 

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व सातारा पोलीस अधीक्षकांनीही सीसीटीव्ही फुटेजसह  अन्य पुरावे पोलीस महासंचालक प्रदीप जयस्वाल,अप्पर पोलीस महासंचालक [ कारागृह ] सुनील रामानंद यांच्याकडे सादर केले. कारागृह प्रशासनाने वरिष्ठाधिकाऱ्यानी चॊकशीचे आदेश दिल्याने कळंबा कारागृहातील अधिकारी, सुरक्षा रक्षकांत खळबळ उडाली होती. 

सावला टोळीचा म्होरक्या वीरेन सावला व अन्य साथीदाराच्या गैर कृत्याची पोलीस महासंचालक, अप्पर महासंचालकानी गंभीर दाखल घेत सर्वांची अंडासेलमध्ये रवानगी केली होती. मात्र, वरिष्ठाच्या चॊकशीत अनेक बाबी उघड होऊ लागल्याने शैलेश गुणवंत मणियार, वीरेन प्रकाश सावला , [ बोरिवली पूर्व मुंबई ] यांच्यासह जितेंद्र उर्फ जितू कांतीलाल गोसालिया [ चारकोप कांदिवली वेस्ट मुंबई ] जयेश हिरजी सावला  [ बोरिवली पूर्व ]यांच्यासह १० जणांना पुणे येथील येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. 

  • आणखी ६ जणांना हलविणार 

मटकाबुकी सलीम मुल्ला, राकेश अग्रवाल, मनीष अग्रवाल ,झाकीर मिरजकरसह टोळीतील आणखीन सहा संशयित आरोपीना पुणे, मुंबई अथवा नाशिक कारागृहात हलविण्याचा कारागृहात प्रशासनाच्या हालचाली सुरु आहेत. दोन दिवसात आदेश मिळताच त्याची तत्काळ कार्यवाही होण्याचे संकेत आहेत, असेही समजते.