सेन्सेक्सची विक्रमी झेप कायम : शेअर बाजारात उत्साह

0
95

मुंबई : शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची विक्रमी झेप कायम आहे. काळ गुरुवारी हॅट्रिक साधलेल्या सेन्सेक्सची आज शुक्रवारी बाजार सुरु होताच तेजी कायम होती. प्रमुख कंपनीच्या शेअर्सचे मूल्य गेल्या दोन दिवसात वाढले आहेत. शुक्रवारी बाजार सुरु होताच तेजी कायम होती. प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य गेल्या दोन दिवसात वाढले आहेत. तरीही गुंतवणूकदाराकडून चढ्या दराने शेअर्स ची विक्री सुरूच होती. गुंतवणूक दारांच्या उत्साहामुळे सेन्सेक्सने उच्चाक गाठला आहे. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ९६ अंकांनी वृद्धी साधून ४१, ७६८ या अकापर्यंत उसळी घेतली. निफ्टीही तेजीत आहे. 

बाजारातील उत्साहामुळे सेन्सेक्स गुरुवारी ४१,६७३ अंकापर्यंत झेप घेऊन उच्चांक केला होता. हि उसळी आजही कायम आहे. 

गेले तीन सेन्सेक्सने उच्चांक मोडला आहे. आयटी , वाहन आणि ऊर्जा उद्योगातील शेअर्सना मागणी वाढली आहे. यामुळेच सेन्सेक्स वधारला आहे. गेल्या दोन दिवसात सेन्सेक्स मध्ये ६९९ अंकांनी वाढ झाली आहे . यामुळे प्रमुख शेअर्सच्या मूल्यात मोठी वाढ झाली आहे. 

रिलायन्स ,भारती एअरटेल ,हिंदुस्थान युनिलिव्हर , महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्सना अधिक मागणी आहे.