साहित्य अकादमीच्या पुरस्कारांत वशिलेबाजी

0
92

साहित्य अकादमीच्या पुरस्कारांत वशिलेबाजी ? 

कदाचित अजूनही या अनुराधा पाटील याच्या कवितासंग्रहास यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला, याबद्दल त्याचे अभिनंदन,मात्र यानिमित्ताने या पुरस्कारांमध्ये कशी वशिलेबाजी चालते, आपल्या माणसाची पुस्तके कशी पुढे आणली जातात हि अकादमीच्या कारभारातील काळी बाजूही पुढे आली आहे. यातून अनेक बोगस पुस्तकांनाही पुरस्कार लाभून रातवा [ चंद्रकुमार नलगे ] , पानिपत [ विश्वास पाटील ], उद्या [ नंदा खरे] आदी सुंदर पुस्तकावर अन्याय झाल्याचे साहित्यक्षेत्राने अनुभवले आहे. 

साहित्य अकादमीच्या नियमानुसार तीन साहित्यकांच्या समितीकडून पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड केली जाते. यंदा या पॅनल वर आसाराम लोमटे,वासुदेव सावंत, व लक्ष्मण माने हे होते. यापैकी लोमटे याच्या ‘ आलोक ‘ या कथासंग्रहणाला २०१६ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच हे पुस्तक शब्द प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केले होते. त्याशिवाय लोमटे याची अन्य दोन पुस्तके शब्द नेच प्रकाशित केली आहेत. विशेष म्हणजे, अनुराधा पाटील याचा ‘ कदाचित अजूनही ‘ कथा संग्रहही शब्द प्रकाशानेच प्रकाशित केला आहे. साहजिकच, लोमटे यांच्यामुळेच अनुराधा पाटील याना हा पुरस्कार मिळाल्याची जोरदार चर्चा साहित्य वर्तुळात सुरु झाली असून, साहित्य अकादमीसारखी संस्था इतकी निष्काळजी कशी काय असू शकते, याबाबत उलट- सुलट चर्चेला उधाण आले आहे. एखाद्या खटल्यामध्ये हितसंबधांना पुसटसा संशय आला तरी मोठं- मोठ्या खटल्यात न्यायाधीश स्वतःहून दूर होतात किंवा त्यांना दूर ठेवले जाते. मात्र, यंदाच्या साहित्यात अकस्मीच्या पॅनेलबाबत हि काळजी घेण्यात आलेली नसल्याने संशयाला पुष्टीच मिळाली आहे. 

साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये कशी वशिलेबाजी चालते, यांची साहित्य वर्तुळात नेहमीच चर्चा चालते. पॅनेलवर असलेले सदस्य पुस्तकांपेक्षा दुसऱ्या सदस्यावर दबावही टाकला जातो. तर काही लेखकांच्या खिशात पॅनेलवरच्या लोकांची नावे अगोदरच पडून या ‘ कृष्ण ‘ लीला काय आहेत, याबाबतही चर्चा होतात. 

पाटील यांच्या कविता संग्रहात पुरस्कार देताना १ जानेवारी , २०१३ ते डिसेंबर ३१ , २०१७ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके विचारात घेण्यात आल्याचे अकादमीने घोषित केले आहे, मात्र या कालावधीत मॅगझिनमधून  सुटतेय गोळी [ कवितासंग्रह- बालिका नामदेव] दाह [ कादंबरी – सुरेश पाटील, ] ईश्वर डॉट कॉम [ कादंबरी – विश्राम गुप्ते], भंगार [ कादंबरी – अशोक जाधव ] यांच्याबरोबर लोक माझा संगती , सहकाऱधुरीण,टाटायन ,मन में  है विश्वास यासारखी अनेक सुंदर पुस्तके प्रकाशित झाली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते, मात्र अडकडमीकडून जी ग्राऊंड लिस्ट तयार करून घेतली जाते, त्यासाठी हे दोन विशेष तज्ञ नियुक्त केले जातात तेथूनच या गडबड- घोटाळ्यास सुरुवात होत असल्याचे साहित्य क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.