शरद पवार आणि ऑस्ट्रेलियाची अधोगती काय आहे संबंध

0
63

शरद पवार आणि ऑस्ट्रेलियाची अधोगती काय आहे संबंध. ? विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास महिना उलटल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यामंत्रीपसाची शपथहि घेतली. आणि देशात राजकारणाचा नवा इतिहास लिहिला गेला . या सरकार स्थापनेत कॅप्टनची भूमिका बजावली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. विधानसभा निवडणुकीची प्रचार धुमाळी सुरु झाल्यापासून सरकार स्थापनेपर्यंत शरद पवारांचे नाव वारंवार चर्चेत राहिले. मात्र , आता ते एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आले. देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक महत्वाची पदे शरद पवार यांनी भूषवली आहेत. त्याप्रमाणे देशाबाहेरील त्याचा बोलबाला राहिला आहे, राजकारणात व्यतिरिक्त पवारांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ [बीसीसीआय ] आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ [ आयसीसी ] चे अध्यक्ष पद भूषविले आहे. पवार ज्यावेळी आयसीसीसीचे अध्यक्ष होते त्यावेळी त्याच्यासोबत एक अपमानास्पद घटना घडली होती. २००६  साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऑस्ट्रोलियाने विजय मिळवला होता. आणि या स्पर्धेचं पारितोषिक वितरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन आणि कायम वादग्रस्त राहिलेला कर्णधार रिकि  पॉन्टिंग आणि आणखी एका खेळाडूने पवारांशी चुकीचं वर्तन केलं होत. त्यानंतर संपूर्ण देशभर पॉन्टिंग आणि ऑस्ट्रोलीया टीमचे पोस्टर जाळण्यात आले होते. त्यांच्या प्रतिकृतीची धिंडही काढण्यात आली होती . तसेच पवार यांच्या पदाचा आणि वयाचा अपमान केल्याप्रकरणी जगभरातील प्रसारमाध्यमांनी ऑस्ट्रेलिया  टीमला चांगलाच फैलावर घेतलं होत. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या घडामोडीनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. भाजप समर्थकांनी ऑस्ट्रेलीयाचे हे कृत्य बरोबर होते, असे म्हणटले, आहे. तर भाजप विरोधकांनी यानंतर ऑस्ट्रोलियाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब दिवस आले. शी टिप्पणी केली आहे. २००७ चा टी २० वर्ड कप, २०११ च्या एकदिवसीय वर्ल्डकप मध्ये भारताने ऑस्ट्रोलियाचा पराभव केला होता आणि त्यानंतर भारतात सुरु झालेल्या आयपीएल सारख्या क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या  खेळाडूंवरही लिलावात बोली लावली होती. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया संघाचे गर्वहरण केले होते. शरद पवार हे सध्याच्या राजनीतीचे सगळ्यात मोठे चाणक्य आहेत, याची कल्पना ऑस्ट्रेलिया टीमला नसेल. सध्या जागतिक क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डपेक्षा बीसीसीआय हि मनाची संस्था म्हणून ओळखली जाते. बीसीसीआयला जगात सर्वात मोठी क्रिकेट संस्था बनविण्यात पवार यांचे योगदानही त्यांना माहित नाही, असेही काहीजणांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here