तर… झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळा साहेबांनी फटके मारले असते-शरद पवार

0
86

मुंबई: औरंगाबाद येथील होऊ घातलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरेच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यात आली, मात्र बाळासाहेब जीवनात असते आणि त्यासाठी झाडे तोडली असती तर, झाडे तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी फटके मारले असे शरद पवार म्हणाले. 

महात्मा गांधी मिशन या संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापीठाचे कुल पती अंकुशराव उर्फ बाबुराव कदम यांच्या अमृतमहोत्सवानिमित्य सत्कार समारंभात शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार यांनी आपल्या भाषणात औरंगाबाद येथील होऊ घातलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा उल्लेख केला. या स्मारकासाठी महापालिकेच्या वतीने प्रियदर्शनी गार्डनमधील जवळपास ५०० झाडे तोडण्यात आली. महापालिकेत सध्या शिवसेनेचा महापौर आहे. 

मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उद्याने आहे , ते बाळासाहेब जिवंत असते आणि त्यांच्यासाठी झाडे तोडली असती तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना फटके मारले , असते असे शरद पवार म्हणाले . विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आनि माजी खासदादर चंद्रकांत खैरे व महापौर नंदकुमार घोडले हे सुद्धा उपस्थित होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. माजी मंत्री व एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती दिली. या अमृतमहोत्सवी  गौरव सोहळ्याच्या निमित्याने कदम यांच्या जीवनावर आधारित शिल्पकार या गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या करण्यात आले.