शिर्डीला दर्शनाला जाताना कार अपघात : चार ठार, दोघे जखमी

0
67
ओरंगाबाद: शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची भरघाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  हा अपघात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद नगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ घडला. ह्यात चालक दत्ता वसंतराव डांगे [ वय ३० ] आकाश प्रकाश मोरे, [ वय ३० ]अमोल नंदकिशोर गव्हाळकर [ वय २२ सर्व रा. शेवाळी ता. जि . जालना ] यांचा मृत्यू झाला. तर संतोष राऊत [ वय १७ ] आणि किरण [वय १६ ] हे जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, जालना तालुक्यातील शेवली येथील पाच महाविद्यालयीन मुलांनी शिर्डी हित  जाण्यासाठी किरायाने कार घेतली. चालकांसह सहा जण कारमधून शेवलीहून शुक्रवारी रात्री ९ वाजता शिर्डीकडे निघले. जालना जवळ एका हॉटेल मध्ये जेवण केले आणि पुढे प्रवासाला निघाले, दरम्यान ,काही जण झोपी गेले, औरंगाबाद गोलवाडी फाट्याजवळून जाताना चालकाचे नियंत्रणसुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळली .
त्यावेळी चालकासह तिघांचा जागीच तर एकाच घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस स्टेशनचे कॉ . संजय वामने , आर. डी , वडगावकर,पी. एस.अडसूळ व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघात ग्रस्तांची घाटी रुग्णालयात दाखल केले. सकाळी चार च्या सुमारास चालक दत्ता डांगे, आकाश मोरे [ वय ३०] व अमोल गव्हाळकर याना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर अक्षय शिलवंत यांचा ट्रामा केअर मध्ये उपचारादरम्यान सकाळी साडे चार वाजता मृत्यू झाला. तर जखमी संतोष राऊत व किरण गिरी यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातील संतोष किरकोळ तर किरण गंभीर जखमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here