शिवाजी पूल परिसरातील रस्त्याचे काम महिलांनी पडले बंद

0
79
shivaji bridge

शिवाजी पूल परिसरातील रस्त्याचे काम महिलांनी पडले बंद 

कोल्हापूर [प्रतिनिधी] : शिवाजी पूल  ते गंगावेश हा रस्ता पूर्ण उखडलेले चार दिवसांपूवी पंचगंगा तालमीच्या कार्यकर्त्यानी महापालिकेला या रस्त्या बाबत निवेदन दिले होते. त्यावेळी पालिकेने प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र रस्त्याची पाहणी न करता पालिकेने फक्त खड्डे भरण्याचे काम सुरु केले. शिवाजी पूल परिसरातील महिलांना याची माहिती होताच त्यांनी कामाच्या ठिकाणी येऊन ते काम आज [ शनिवार ] बंद पडले. 

गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. वाहनधारकांना कसरत करत आपली वाहने चालवावी लागत आहेत.  उखडलेला रस्ता, त्यामध्ये रस्त्याची दोन्ही बाजूला असणारे बेशिस्त पार्किंग यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. तसेच रस्त्याचे काम सुरु असताना धुळीच्या लाटांमुळे इथल्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याचे परिसरातील महिलांनी सांगितलेलं. 

तसेच एक -दोन दिवसात रस्त्याची दुरुस्ती नाही झाली तर रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आता. दरम्यान , आज सायंकाळच्या सुमारास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून तो लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आश्वासन येथील रहिवाश्यानी दिले आहे.