शिवाजी मार्केटमधील असुविधा प्रश्नी मनसे आक्रमक

0
84
Raaj-Mns-Flag

शिवाजी मार्केटमधील असुविधा प्रश्नी मनसे आक्रमक

शिवाजी मार्केट भाजी मंडईतील असुविधेविरोधात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने शिवाजी चौकात प्रतिकात्मक भाजी विक्री करून आंदोलन करत महानगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले . 

भाजी मार्केट मध्ये अस्वच्छता असून वीज आणि पाण्याचा अभाव आहे. मोजकेच दुकान गेले वगळता अन्य गेले बंद असल्याने शिवाजी मार्केट भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान झाले. आहे. स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीमुळे ग्राहक आणि नागरीकातून इकडे पाठ फिरवली जात आहे. शिवाजी मार्केटमध्ये सुधारणा करावी यासाठी महानगरपालिकेला निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात होते त्यामुळे शुक्रवारी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजी मंडईतील स्वच्छता करावी, स्वतत्र जिना करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली . आंदोलनातून राजू जाधव, राजू बागवाल, बबन सावरे, अण्णा तिलवे , समीर बागवान , रमजान मकानदार यांच्यासह भाजी विक्रेते सहभागी झाले होते.