शिवसेनेमध्ये मराठवाड्यातून मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार

0
87

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार असे बोलले जात आहे. तर मराठवाड्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर यासाठी अनेक नावांची चर्चा पाहायला मिळत आहे.

यामध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत येऊन सिलोडमध्ये आमदार झालेले अब्दुल सत्तार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सत्तार हे या आधी सुद्धा आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते. तसेच शिवसेनेत ते एकमेव मुस्लिम आमदार आहेत. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना संधी देऊ शकतात. 

तसेच सत्तार यांच्या नावाबरोबर पैठण मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. निष्ठावन्त शिवसैनिक म्हणून भुमरे याची पक्षात ओळख असून , ते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जातंय. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 

या सोबतच उस्मानाबादमधून तानाजी सावंत, परभणीचे राहुल पाटील, यांचं नावही चर्चेत आहे. तसेच शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी केली असल्याची चर्चा आहे. मात्र ऐनवेळी कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.