शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भाजप विरोधात फटकेबाजी सुरुच

0
76

मुंबई: गुरुवारी [ ता.  २८] उद्धव ठाकरे यांनी मुखमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही आज [ ता. २९] शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरची भाजप विरोधातील फटकेबाजी सुरूच ठेवली आहे. ‘ हम शतरंज मे कूछ ऐसा कमल करते है , कि बस पैदल हि राजा को मत करते है ‘ हा शेर संजय राऊत यांनी  केला. या शेअरच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील राजकीय नाट्यमय घडामोडीत राऊत यांनी शिवसेनेची खिंड खंबीरपणे लढवली. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी पत्रकार परिषद घेणे बाद केले आहे. मात्र सोशल मीडियाच्यातून भाजपला क्लीन बोल्ड करण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, त्याच शिवतीर्थावर गुरुवारी विराट जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  “मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो कि …. ‘ असे बोलल्यावर शिवतीर्थावरील तो ऐतिहासिक क्षण देखील थरारून उठला आणि या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी शिवतीर्थावर लोटलेला विराट जनसागरहि रोमांचित झाला. उद्धव यांच्यासह शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, यांनी तर राष्ट्रवादी कडून जयंत पाटील, छगन भुजबळ , आणि काँग्रेसतर्फे बाळासाहेंब थोरात, नितीन राऊत या सात नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ६ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नेहमीच्या ठाकरी शैलीत दोन्ही हात उंचावून जनसमुदायाला अभिवादन केले. ज्या शिवतीर्थावरून दसरा मेळाव्यात शिवसेनेची सिहगर्जना घुमली , त्याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुर्तीला वंदन करीत मुख्यामंत्रीपदाची शपथ घेत ठाकरे कमालीचे भावुक झाले आणि त्यांनी व्यासपीठावरच माथा टेकविले आणि तमाम महाराष्ट्रासमोर ते नतमस्तक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here