साखर तंत्रज्ञान , साखर अभियांत्रिकी हे विषय डोक्यावरून जाणारे

0
90
year-ender-poll

पुणे: उसापासून साखर निघते , एवढेच माहिती  साखर तंत्रज्ञान , साखर अभियांत्रिकी हि सगळे विषय माझ्या डोक्यावरून जाणारे आहेत. साखरेमागे एवढे मोठे काम असते याची कल्पना देखील नव्हती. असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले. त्यामुळे बोलताना काही चुकले तर वडिलांचे मित्र जबाबदार असतील असे ते शरद पवारांकडे बघून म्हणाले. 

पुण्याजवळील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. उसभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आली . त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब  थोरात, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, विजयसिह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थिती होते. 

पुढे ठाकरे म्हणाले कि  , आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. साखरेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी देशाला दिशादर्शक ठरेल असे धोरण ठरवणार आहोत. दोन लाख रुपयांची कर्ज माफी केली त्याप्रमाणे त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकरिता नवी योजना विचाराधीन आहे, तसेच नियमित वेळचे वेळी कर्ज भरणाऱ्या  , आणि थकबाकी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी नवी योजना आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • मी राष्ट्वादीचाच : मोहिते-पाटलांचा यु टर्न 

विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती झाली होती. त्यावेळी विजयसिह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राज्यात मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. मात्र , त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. त्यांनी आज “मी राष्ट्रवादीत” च असल्याचा मोठा गौप्यस्फोट करत एकप्रकारे भाजपला ‘ दे धक्का दिला आहे. प्रचारादरम्यान उघड उघड भाजपचा प्रचार केला नसला तरी मुलाच्या विजयासाठी आतून बाहेरून सूत्र हलवल्याची चर्चा आहे. पण आता त्यांनी भाजपला दे धक्का देत मोठे विधान केले आहे. यावर भाजप कडून कसे उत्तर मिळते ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.